Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑल इंडिया लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अधिवेशन उत्साहात

राहाता ः ऑल इंडिया लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे राज्यस्तरीय एक दिवशीय अधिवेशन सिद्धसंकल्प लॉन शिर्डी येथे संपन्न झाले या कार्यक्रमासाठी भाज

पालकमंत्री घेणार अखेर जिल्ह्यातील कोविडचा आढावा
पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील
धारणगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान

राहाता ः ऑल इंडिया लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे राज्यस्तरीय एक दिवशीय अधिवेशन सिद्धसंकल्प लॉन शिर्डी येथे संपन्न झाले या कार्यक्रमासाठी भाजचे महामंत्री संजय केनेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते. तर उदघाटक म्हणून डॅा.ओमप्रकाशजी शेटे, डॉ. अमरनाथजी सोलपूरे, बालाजी डोळे, एम. एम. दास, देवेंद्र प्रसाद, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, व साई वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या अधिवेशनासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे सन्मान करण्यात आला.
या अधिवेशनासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेस्ट लेक्टर डॉ. प्रकाशजी पंगम हिमॅटोलॅाजिस्ट व डॉ. शिल्पा असेंगावकर प्रा.व विभाग प्रमुख शा.वै. म. धुळे यांनी प्रयोगशाळा मध्ये काम करताना काय काळजी घ्यावी या विषयी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन प्रत्येक सभासद यांच्या ज्ञानात भर घातली.
ओमप्रकाशजी शेटे म्हणाले की, कोविड काळात आपण फार महत्वाची भूमिका फार पडली आहे पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये बर्‍याच तंत्रज्ञ यांच्या नोंदी होत नाही त्या झाल्या पाहिजे, आपले योगदान समाजासाठी खूप मोठे आहे तुमच्या प्रलंबित मागणीसाठी निश्‍चित प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले. या अधिवेशनात डॉ. संजय उबाळे यांची प्रदेशाध्यक्षपदी सेक्रेटरीपदी कैलास पवार, ट्रेजरर सय्यद यांची निवड करण्यात. साईबाबांच्या पवित्र पावन भूमीत सर्वांचे स्वागत अमोल पाटणी नॅशनल ट्रेजरर, रामेश्‍वर लांडगे मुख्यसमन्वयक तथा झोनल सेक्रेटरी, संजय उबाळे ऑर्गनिझिंग चेअरमन, अनिल बिराजदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व संयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS