Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रीतिसुधाजी स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के

राहाता ः आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या यज्ञकुंडात अर्पण करणार्‍या प्राचार्य डांगे पॅटर्नचे प्रणेते असलेल्या इंद्रभान डांगे यांच्या राहाता येथील

अजय फटांगरे यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वातून नावलौकिक मिळवला : ना. थोरात
कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टेजचे शुल्क ; या लुटालुटीला मनपा जबाबदार असल्याचा मनपाचा आरोप
‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ

राहाता ः आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या यज्ञकुंडात अर्पण करणार्‍या प्राचार्य डांगे पॅटर्नचे प्रणेते असलेल्या इंद्रभान डांगे यांच्या राहाता येथील प्रीतिसुधाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.प्राचार्य ज्ञानेश डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमधील विद्यार्थ्यांनी हे अलौकिक यश मिळवत 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. श्रद्धा सचिन वैद्य आणि ओम पंढरीनाथ चव्हाण या दोघांनी 94 टक्के गुण मिळवत स्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकाविला. गायत्री गणेश रोहोम 93 टक्के-द्वितीय, शाहू हेमंत कोर 92 टक्के-तृतीय, आशितोष रामदास गोवर्धने 92 टक्के-चतुर्थ तर हरिओम मनोज बोढरे 91 टक्के गुण मिळवत बोर्ड परीक्षेत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. प्रीतिसुधाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इ.10 वी तील 10 विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत नव्वद टक्क्यांहून अधिक गुण, 46 विद्यार्थ्यांना ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण,23 विद्यार्थ्यांना सत्तर टक्क्यांहून अधिक गुण तर 6 विद्यार्थ्यांना साठ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहे.प्रीतिसुधाजी स्कूलचे शिक्षक अशोक गाढवे, सचिन गिते, बसवराज पाटील,जनार्दन साबळे,आदिनाथ मुनमुने, अर्चना घोगरे, निखिल बेद्रे आदी शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे, शशिकांतराव डांगे, शिवाजीराव डांगे, भगवानराव डांगे, मेघश्यामजी डांगे, डॉ. पांडुरंग गुंजाळ, डॉ. मधुकर देशमुख, शिवाजी देवढे, राहाता तालुका प्रेस क्लब व रोटरी क्लब ऑफ राहाता शिर्डीचे सदस्य आणि स्कूलचे आजी-माजी पालक यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS