शेतकर्‍यांना चिरडणे पूर्वनियोजित कट ; लखीमपूर खेरी प्रकरणात एसआयटीचा गंभीर खुलासा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांना चिरडणे पूर्वनियोजित कट ; लखीमपूर खेरी प्रकरणात एसआयटीचा गंभीर खुलासा

नवी दिल्ली :उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये 4 शेतकरी आणि 1 पत्रकार अशा पाच जणांना चिरडले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभर जनक्षोम

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने आर्थिक मदत करावी ; खासदार हेमंत पाटील यांनी मागणी
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही : सहकारमंत्री
माण तालुक्यात सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

नवी दिल्ली :उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये 4 शेतकरी आणि 1 पत्रकार अशा पाच जणांना चिरडले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभर जनक्षोम उसळला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणी उत्तरप्रदेश सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने आपल्या चौकशी अहवालात धक्कादायक खुलासे केले असून, शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.
एसआयटीने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहित या प्रकरणांतील आरोपींवर हत्येचा आरोप आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळेया प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्य आरोपी यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस पथकाच्या प्रमुखांनी न्यायाधीशांना याबाबत चिट्ठी लिहिली आहे. यात आशीष मिश्राविरोधातील आरोप दुरुस्त केले पाहिजे असं म्हटलं आहे. या प्रकरणी आशीष मिश्रा आणि त्याचे इतर सहकारी हत्या आणि कटाच्या आरोपांचा सामना करत आहेत. यात हत्येचा प्रयत्न आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली आहे.उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आणि सत्ताधारी भाजपाविरोधात सत्ताविरोधी जनमत असताना या घडामोडी भाजपाची डोकेदुखी वाढवणार्‍या ठरत आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या आंदोलक शेतकर्‍यांना मागून येऊन गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. या लखीमपूरमधील या घटनेत 4 शेतकर्‍यांचा आणि एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. महिंद्रा थार गाडीसह एकूण 3 गाड्यांच्या ताफ्यानं शेतकर्‍यांना चिरडल्यानंतर घटनास्थळावर उपस्थित शेतकरी संतापले. त्यांनी ज्या गाड्यांनी आंदोलकांना चिरडलं त्या गाडीतील काही लोकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंत्री अजय मिश्रा यांच्या महिंद्रा थार गाडीचा चालक आणि 2 भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांवर होणार परिणाम
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतांनाच, एसआयटीने केलेल्या गंभीर खुलाशानंतर भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षांनी या घटनेनंतर सातत्याने अजय मिश्रा यांना पदावरून हटवण्याची मागणी केलीय. मात्र, आतापर्यंत मोदी सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. मात्र, तपासात समोर येत असलेल्या नव्या पुराव्यांमुळे भाजपावरील दबाव वाढण्याची चिन्हं आहेत. लखीमपूर हत्याकांडानंतर शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना सातत्याने दिसून आली आहे.

सदोष मनुष्यवधाच्या जागी खुनाचे कलम जोडले जाईल
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 आरोपींविरुद्ध कलम 279, 338, 304अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर एसआयटीने हा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. आता तपास यंत्रणेने कलम 307, 326, 302, 34, 120इ, 147,148,149,3/25/30 अन्वये खटला चालवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

COMMENTS