Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरेच्या कृषीदुतांचे पिंपळवाडीत स्वागत

लोणी ः  राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथे कृषी महाविद्यालय, लोणी येथील कृषीदुतांचे आगमन झाले आहे. यावेळी शेतकर्‍यांनी या कृषीदुतांचे स्वागत केले.

संगमनेरमध्ये डोक्याला पिस्तुल लावत 4 लाख 60 हजारांची चोरी
नगरला होणारे अंत्यविधी स्थानिक स्तरावर करा
स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून उलगडणार सर्जिकल स्ट्राइकचा थरार| फिल्मी मसाला | LokNews24 |

लोणी ः  राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथे कृषी महाविद्यालय, लोणी येथील कृषीदुतांचे आगमन झाले आहे. यावेळी शेतकर्‍यांनी या कृषीदुतांचे स्वागत केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, लोणी येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे कृषी शिक्षण संचालक प्रा.डॉ. उत्तमराव कदम व कृषी महाविद्यालय लोणीचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप आणि प्रा. विशाखा देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत  रुषांक मापारी, कार्तिक परदेशी, शुभम जाधव, तेजस लावरे, गौरव ठाकरे, प्रथमेश गाडे हे पिंपळवाडी येथील शेतकर्‍यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत पिंपळवाडी चे सरपंच विक्रम तुरकणे, उपसरपंच सुनिता तुरकणे, ग्रामसेवक प्रियंका शिंदे, व ग्रामस्थ यांनी कृषीदुतांचे स्वागत केले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदूत येथील शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती, बीजप्रक्रिया, गांडूळखत उत्पादन, चारा पिके, दुग्ध व्यवसाय, बायोगॅस इ. संदर्भात माहिती देणार आहे.

COMMENTS