Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रल्हादाची उत्कट भक्ती आणि ध्रुवबाळाची अचल निष्ठा आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरावी : हभप पुरुषोत्तम कोळपकर

श्रीरामपूर : भक्त प्रल्हादाची उत्कट भक्ती आणि ध्रुवबाळाची अचल, अढळ, ध्येयशील निष्ठा आजच्या उगवत्या तरुणपिढीला प्रेरणादायी असल्याचे मत भागवताचार्य

कोल्हार येथील प्रवरा नदीत बुडून एकाचा मृत्यू  
शिवनाथ चावरे यांचे भाजपचे जिल्हाध्यक्षांकडून सांत्वन
रेशमबाई पिंगळे यांचे निधन

श्रीरामपूर : भक्त प्रल्हादाची उत्कट भक्ती आणि ध्रुवबाळाची अचल, अढळ, ध्येयशील निष्ठा आजच्या उगवत्या तरुणपिढीला प्रेरणादायी असल्याचे मत भागवताचार्य ह.भ.प. पुरुषोत्तम कोळपकर यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर जवळील इंदिरानगर भागातील शिवकृपानगर येथील निर्मळ परिवाराने आयोजित श्रीमद् भागवतकथा सोहळ्यात ते बोलत होते.
ध्रुवबाळाची कथा सादर करतानाच ते पुढे म्हणाले, भगवान श्रीकृष्णाने महायुद्धप्रसंगी कर्तव्यमुख झालेल्या पराक्रमी अर्जुनास केलेला उपदेश हा एक शुद्ध कर्मसिद्धांत आहे. तीच श्रीमदभगवतगीता होय. या ग्रंथाच्या वाचनाने,श्रवणाने, चिंतनाने जीवन धन्य होते, माणूस धर्मशील, कर्मशील, नीतीशील, भक्तिशील आणि निर्भयशील बनतो, असे विचार ह.भ.प. पुरुषोत्तम कोळपकर यांनी विविध प्रसंगातून सांगितला. निर्मळ परिवारातर्फे संतपूजन करण्यात आले. ग्रंथवाचन व्यासपीठावर ह.भ.प. पुरुषोत्तम कोळपकर, भगवतगीताग्रंथ अनुवादक माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांनी विविध भागांचे सादरीकरण केले. भक्त प्रल्हादाची कथा सविस्तर सुंदर पद्धतीने सांगितली. यावेळी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, भीमनाथ कटारे, दीपक शेटे, नाना जायभाये, रंजनाताई जायभाये, सुमनताई मुठे, कांचनताई सुलताने, सीताताई येवले, श्रीयुत येवले, मीराताई पादीर, इंदूताई बोरकर, दुर्गेश्‍वर निर्मळ, मोहिनीताई निर्मळ, कलावती निर्मळ, प्रथमेश निर्मळ, विकास निर्मळ, कैलास निर्मळ, चंद्रभान निर्मळ, विश्‍वदीप निर्मळ, आर्यवीर निर्मळ, ओमराज निर्मळ, वेदिका निर्मळ, कांचन निर्मळ, अर्जुन नवथर आदी उपस्थितांनी भाग घेतला.ह.भ.प पुरुषोत्तम कोळपकर यांनी ध्रुवबाळ कथेचे निरूपण केले. आपल्या अवतीभवती अनेक ध्रुवबाळ आहेत. श्रीअडबंगनाथ तीर्थक्षेत्राचे मठाधिपती , रामायणाचार्य अरुणनाथगिरी, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील अशा अनेकांची चरित्रकथाही विशद केली. आपले आपले आदर्श जसे परंपरेत आहेत तसेच ते आजही आहेत, ते आजच्या युवकांनी पाहून प्रतिकूल स्थितीत जीवन घडवावे असे आवाहन केले. डॉ. उपाध्ये यांनी सर्वांचा पुस्तके देऊन सत्कार करून आभार मानले.

COMMENTS