Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदीप मकासरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

नेवासा फाटा/प्रतिनिधी ः श्रीरामपूर येथील बुद्ध विहार येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आरपीआय आंबेडकर पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे

आसिया शेख हिची पोलिस दलात निवड
शेतकर्‍यांचे पशुधन चोरणारे 4 तासात जेरबंद
आघाडी सरकारमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतभेद l पहा LokNews24

नेवासा फाटा/प्रतिनिधी ः श्रीरामपूर येथील बुद्ध विहार येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आरपीआय आंबेडकर पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कॉ. बाबा आरगडे,सुभाषराव गायकवाड, ह.भ. प. दत्तात्रेय महाराज बैरट, भगवानराव धनगे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे सामाजिक कार्यकर्ते शिवस्वराज्य बौद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण संजय वाघमारे सचिव रमाताई वाघमारे आदिंच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिश मकासरे, नितीन ब्राम्हणे, सूरज मकासरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मकासरे, अमोल शेळके सचिन ब्राम्हणे, सचिन चक्रनारायण, विलास शेळके, गोविंद कांदे आदिंसह मित्र परिवार उपस्थित होते.

COMMENTS