श्रीगोंदा : श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय, श्रीगोंदा येथे विद्यार्थी-पालक-शिक्षक प्रबोधन संवाद मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक

श्रीगोंदा : श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय, श्रीगोंदा येथे विद्यार्थी-पालक-शिक्षक प्रबोधन संवाद मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष घनशाम शेलार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे निरीक्षक प्रा.विलासराव जाधव उपस्थित होते. यावेळी घनशाम शेलार यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, विद्यार्थी हीच पालकांची खरी संपत्ती असून पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत, कुटुंबात शैक्षणिक वातावरण निर्माण करावे व पाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
मोबाईल व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत या मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे निरीक्षक विलासराव जाधव, अजीमभाई जकाते, सुहासिनी खेतमाळीस, सोनाली डांगे, वर्षा खेतमाळीस, राजू जकाते, पद्मिनी महारनवर, ज्योतीताई गजरमल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास व्यासपीठावर बाळासाहेब शेलार, मनीषा शेलार, डॉ.सुनीता वडवकर, मीनल भिंताडे, मृणाली शेलार, आण्णा मोटे पाटील, शामकाका खेतमाळीस, सरपंच मिलिंद कदम, गणेश सांगळे, राणीताई दहातोंडे, शुभांगी भानुसे, प्रा.समीर पांढरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या संवाद मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच कार्यक्रमात रसिकलाल धारिवाल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने शाळेला प्राप्त झालेल्या इंटरॲक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जामदार यांनी केले. सूत्रसंचालन भुजबळ वाय. के. यांनी केले, तर आभार हावलदार एम. एस. यांनी मानले.

COMMENTS