ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत केली चर्चा राहाता : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर बारामती परिसरात शोककळा पसरलेली असतान

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत केली चर्चा
राहाता : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर बारामती परिसरात शोककळा पसरलेली असताना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांनी बारामती येथे भेट देत स्व. अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले.घोगरे यांनी बारामती येथील गोविंद बाग येथे जाऊन ज्येष्ठ नेते खा.शरद पवार, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान स्व. अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाच्या तसेच सार्वजनिक जीवनातील योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या प्रसंगीमाजी आमदार स्व.चंद्रभान घोगरे, स्व.शंकर खर्डे यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. या भेटीत जुने संबंध, सामाजिक बांधिलकी, संघर्षमय प्रवास आणि जनसेवेच्या आठवणींवर चर्चा झाली.
ही भेट केवळ औपचारिक स्वरूपाची न राहता, दुःखाच्या क्षणी मानवी आपुलकी, जिव्हाळा, संयम आणि परस्पर सन्मान यांचे दर्शन घडवणारी ठरली अशी भावना प्रभावती घोगरे यांनी व्यक्त केली. या वेळी घोगरे यांच्यासमवेत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष शीतल लहारे, लोणी ग्रामपंचायत सदस्य सुनीता कोरडे, रणजीत घोगरे तसेच गौतम आहेर उपस्थित होते.

COMMENTS