Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर उन्हाच्या संरक्षणासाठी पाचट टाकावेत

निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या सूचना

शिर्डी प्रतिनिधी ः उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लोखंडी व सिमेंटच्या पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्र खोलींवर 10 मे पूर्वी पाच

नवविवाहित महिलेचा मृतदेह विहीरीत संशयास्पद आढळला! I १२ च्या १२ बातम्या|LokNews24 |
डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली – आमदार आशुतोष काळे
कृषी जैवतंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी उत्तम करीअर संधी ः डॉ.अमोल सावंत

शिर्डी प्रतिनिधी ः उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लोखंडी व सिमेंटच्या पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्र खोलींवर 10 मे पूर्वी पाचट टाकण्यात यावेत. अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, ग्रामसेवक, मुख्याध्यापक व संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत.
                  शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. यात एकूण 1708 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सद्यस्थितीमध्ये उष्णतेची लाट आहे. त्यामुळे ज्या मतदान केंद्रावर लोखंडी व सिमेंटच्या पत्र्याचे छत आहे. अशा केंद्रावर काम करणारे कर्मचारी तसेच मतदानासाठी येणार्‍या मतदारांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळून सुसह्य वाटावे.  व्हीव्हीपॅट मशिन अतिसंवेदनशील असल्याने वाढत्या तापमानामुळे या यंत्रात बिघाड होऊ याची दक्षता घेणेही गरजेचे आहे. तेव्हा लोखंडी व सिमेंटच्या पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्रांच्या छताचे तापमान कमी करण्याच्या अनुषंगाने अशा छतांवर उसाचे पाचट, गवत, ज्वारी, बाजरीचे तडस टाकण्याचे काम 10 मे पूर्वी करण्यात यावे. तसेच छतांवर टाकलेले पाचत, गवत, तडस जोराचा वारा आला तर उडून जावू नये, अशा तर्‍हेने पक्के बांधून ठेवण्याची दक्षता घ्यावी. शिर्डी लोकसभेच्या सर्व विधानसभा मतदार संघातील सर्व तालुक्यात ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक मतदान केंद्र असलेल्या सर्व संबंधित शाळा यांनी संयुक्तपणे व समन्वयाने प्रथम प्राधान्याने तत्काळ आपल्या गावातील पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्राच्या छतावर उसाचे पाचट, गवत, ज्वारी, बाजरीचे तडस टाकण्याचे काम मुदतीत पूर्ण करुन करावे. यासर्व कामांवर संनियंत्रण विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठेवावे. याबाबत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलट टपाली शिर्डी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालयास सादर करावा. सदर बाब ही निवडणुकीसंबंधी व अत्यंत महत्वाची असल्याने हयगय अथवा विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही कोळेकर यांनी दिले आहेत.

COMMENTS