राजकीय खेळी त्वरीत अंकुशात आणायला हव्या !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय खेळी त्वरीत अंकुशात आणायला हव्या !

  आज राणा दाम्पत्याविषयी जो गहजब सुरू आहे, तोच प्रकार आठवड्याभरापूर्वी राज ठाकरे यांच्याविषयी होता. गेला आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र एकाच सभेच्या चर्चे

त्या’ चिमुरड्याच्या खून जन्मदात्या आईकडूनच?
सकल मराठा समाजाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद ची हाक
देशहितवादीचे येत्या रविवारी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते प्रकाशन

  आज राणा दाम्पत्याविषयी जो गहजब सुरू आहे, तोच प्रकार आठवड्याभरापूर्वी राज ठाकरे यांच्याविषयी होता. गेला आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र एकाच सभेच्या चर्चेभोवती गुंतून पडला आहे. अर्थात महाराष्ट्र गुंतून पडला असे म्हणणें निखालस चूक आहे; कारण, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला याबाबीत कांहीच रस नसतो. खरेतर, प्रसारमाध्यमे अवास्तव पध्दतीने बातमी रेंगाळत ठेवून लोकांना त्यावर उकसवित करित राहतात. ज्यांचा बातम्या पाहण्याशी काहीही संबंध नसतो, अशी सामान्य जनता या सगळ्या वातावरणात निवांत असते. मात्र, आपल्या मध्यमवर्गीय समाजाला सतत बातम्या पाहण्याचा एक नाद असतो. राजकारणाला वाईट म्हणायचे आणि राजकीय बातम्या तासागणिक बघत राहतात. त्यातून एक असा आभास निर्माण होतो की, देशात किंवा राज्यात प्रचंड स्फोटक वातावरण निर्माण झाले. परंतु, प्रत्यक्षात सर्वत्र शांतता असते. राज ठाकरे यांच्या त्या भोंग्याचा विषय पोकळच. पण बातम्यांच्या माध्यमातून तो भरीव करायचा निष्फळ प्रयोग झाला. भोंग्याचा विषय दामटला गेला तरी महाराष्ट्रातील प्रत्येक शहर आणि गाव शांततामय वातावरणात होते आणि आहे. सर्व समाज आता सुधारू लागलाय. लोकांना कळते राजकीय नेते सामाजिक सलोखा बिघडवून आमच्या पाल्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात आणि स्वतः मात्र पंचतारांकित आयुष्य जगतात. औरंगाबाद ची सभा ही तसे पाहिले तर संघप्रभावीत राजकीय खेळी ठरली. म्हणजे यात समर्थक आणि विरोधक अशा दोन फळ्या आमनेसामने आणण्याची घटना घडविण्यात आल्या.  ज्या पक्ष-संघटनांविषयी जनतेत संभ्रम आहे किंवा जनतेला अशी शंका आहे की, अमुक एक पक्ष किंवा संघटना, जी पुरोगामी असेल तिने ठाकरेच्या सभेला विरोध किंवा समर्थन व्यक्त केले आहे. बाकी कुणीही या नाट्यात पडले नाही. एखाद्या व्यक्तीची राजकीय दादागिरी सुरू असताना लोकशाही व्यवस्थेत सरकार केवळ वरवरचे उपाय करित असेल तर अशावेळी सरकारच्या नितीविषयी देखील लोकांना पुरेसा विश्वास राहत नाही. त्यामुळे, शासन संस्थेने कोणतेही पाऊल तातडीने उचलायला हवे. दोन समुदायात अतिरेक आणि भीती अशा भावना टोक गाठेपर्यंत बघ्याची भूमिका घेतली तर, जनता जी भितीत असते ती दाद अथवा न्याय कुणाकडे मागणार? तसं पाहिलं तर धर्म हा जेव्हा राजकारणात येतो तेव्हा त्या धर्माच्या सर्वात तळाच्या लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. हिंदू समुदाय आता पुरोहितांच्या अशा प्रकारच्या राजकारण किंवा इंद्रजाल समजून घेऊ लागला आहे. त्यामुळे, समाजात हिंदू खतरे में म्हणणाऱ्या पुरोहितांना त्यांच्या हितरक्षणासाठी आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावे लागते, हे आताच अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर झालेल्या प्रतिक्रियात्मक आंदोलनात दिसून आले. एकंदरीत, गेला आठवडाभर महाराष्ट्र वेठीस जो धरला गेला त्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्हींच्या निती कारणीभूत आहेत. समाजात अशांतता निर्माण करून दंगलीसदृश्य वातावरण उभे करणाऱ्या राजकीय नेत्यांवर कायद्याचा कडक बडगा उगारायला हवा. ज्यांची मुले म्हणतात की, आमच्यावर खटले दाखल करा, तर त्यांना गुन्ह्यांचा ससेमिरा काय असतो हे सरकारने दाखवून देण्यासाठी तरी कारवाई करावी. समाजमन दीर्घकाळ भीतीत ठेवणे किंवा अस्थिर करणे हे कायद्याने फौजदारी गुन्हा असूनही त्यावर कोणतेही पाऊल उचलले जात नसेल तर ते अधिक चिंताजनक आहे. उद्या हिंदू – मुस्लिम दोन्ही समुदायांचे सण उत्सव. अशावेळी सभा घेण्याचा अट्टाहास हाचमुळी राजकारणाला हुकुमशाही वळणाकडे नेण्याचा प्रकार आहे.

COMMENTS