Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरीत वाळू माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीसांचा सर्जिकल स्ट्राईक

नांदेड । प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई केली आ

24 वर्षांनंतरही मैत्रीची नाळ तुटली नाही; गुजराती हायस्कूलच्या 2003 च्या दहावीच्या बॅचचे ‘उमंग’ स्नेहसंमेलन उत्साहात
वाहतूक कोंडीने नांदेडकर हैराण; मुख्य रस्त्यांवर रोजचाच त्रास, प्रशासनाकडे ठोस उपायांची अपेक्षा
Nanded : जिल्हापरिषद शाळेमध्ये चालतो मटका व दारूचा व्यवसाय (Video)

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदी पात्रात छापा टाकून तब्बल 54 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक  अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 5 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की भनगी, वाहेगाव आणि पिंपळगाव (निमजी) शिवारातील गोदावरी नदी पात्रात इंजिन व तराफ्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नदी पात्रात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच चार अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर साहित्य आढळून आले. पोलिसांनी 45 ब्रास वाळू (अंदाजे किंमत 2 लाख 25 हजार रुपये), 4 इंजिन (12 लाख रुपये) आणि 80 तराफे (40 लाख रुपये) असा एकूण 54,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, घटनास्थळी आढळलेले तराफे व इंजिन पंचांसमक्ष तोडून व जाळून नष्ट करण्यात आले, तर जप्त केलेली वाळू सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी मारोती शंकर पचर्लिंग (वय 40 वर्षे, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 303(2), 3(5), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9, 15 तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड)  सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोहेकॉ वसंत केंद्रे, पोकॉ माळगे, पोकॉ समीर, पोकॉ आसीफ व पोकॉ कांबळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या धाडसी कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकार्‍यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

COMMENTS