Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्याला विक्रीसाठी जात असलेला लाखो रुपयांचा गांजा पोलिसांनी केला जप्त

धुळे प्रतिनिधी - धुळे शहरातील पांझरा चौपाटी परिसरात देवपूर पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या कार

डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील तणावप्रकरणी सात गुन्हे दाखल
रशिया आणि ताजिकिस्तानने उचललेल्या पावलामुळे अफगाणिस्तानातील वातावरण पुन्हा तंग होण्याची शक्यता.
जिल्ह्यात 17 जुलै रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मनाई आदेश लागू

धुळे प्रतिनिधी – धुळे शहरातील पांझरा चौपाटी परिसरात देवपूर पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली असून हा लाखो रुपयांचा गांजा नेमका कुठून कुठे नेला जात होता याबाबतची माहिती सध्या देवपूर पोलिसांकडून घेतली जात आहे.धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गांजाच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शिरपूर तालुका तसेच साक्री तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून गांजाच्या शेतीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असताना आज धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या जुनी चौपाटी जवळ पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा जप्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.धुळे शहरातील जुनी पांझरा चौपाटी येथे देवपूर पोलिसांनी हा लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असून सूर्यकांत दिलीप तमायचेकर वय 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथून या तरुणांनी हा गांजा आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबतची गोपनीय माहिती देवपूर पोलिसांना मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून सदर तरुणाला अटक केली आहे. हा गांजा या 20 वर्षीय तरुणाने नेमका कुठून आणला व कुठे नेला जात होता याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

COMMENTS