Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त

फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलीसांनी पवारवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत पवारवाडी ते शिंदेनगर जाणारे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली उघड्यावर

इस्लामपूर शहरातील ट्रॉफीक सिग्नलचे काम सुरु; अनेक दशकाचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी : निशिकांत भोसले-पाटील
सातारचे खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटिव्ह
थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या

फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलीसांनी पवारवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत पवारवाडी ते शिंदेनगर जाणारे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली उघड्यावर चाललेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल संतोष विरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवारवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत पवारवाडी ते शिंदेनगर जाणारे रस्त्याच्या कडेला असलेल्या शामराव पवार यांचे मालकीचे नवीन घराचे पूर्वेस असलेल्या झाडाचे खाली उघड्यावर संशयित ज्ञानेश्‍वर माणिक भिसे (वय 34), संदेश कांतराम निखळजे (वय 30) दिलावर अब्दुल सय्यद (वय 32) सजीत फकीर तांबोळी (वय 24, सर्व रा. पवारवाडी, ता. फलटण) हे जुगार खेळताना आढळून आले आहेत.
त्यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यांच्याकडून पैसे, मोबाईल, मोटार सायकली असा 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार सुर्यवंशी करत आहेत.

COMMENTS