नागपूर प्रतिनिधी - नागपूरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 कोटी 91 लाख रुपये किंमतीच्या एक किलो ९११ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलंय. नागपूर पोली
नागपूर प्रतिनिधी – नागपूरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 कोटी 91 लाख रुपये किंमतीच्या एक किलो ९११ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलंय. नागपूर पोलीसांच्या अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथकाची ही आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष ॲापरेशन राबवत, ही कारवाई केली. कुणाल गबने आणि गौरव कालेश्वरवार यांच्याकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेय. यामागे कोण मास्टरमाईंड आहेत, यासह ड्रग्ज तस्करीत कोण कोण सहभागी आहे, याचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलीसांनी विशेष पथक गठीत केले. अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नागपूरातील सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आलीय. अंमली पदार्थ विरोधी पथकाची नागपूरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई. होळीच्या निमित्ताने नागपूरात एमडी ड्रग्ज पाठवण्यात आल्याच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
COMMENTS