Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीच्या  निरोप समारंभात कवितांचा बहर

अकोले : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रतनवाडी युनिट–मुतखेल (ता.अकोले, जि.अहिल्यानगर) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी (दि. १३) उत्साहात पार पडला. कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती मोहरे व उपाध्यक्ष विजय इदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  मुतखेल गावच्या सरपंच दीपाली रोंगटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मराठी पुस्तकातील ‘रानवेडी’ व ‘वनवासी’ या कवितांचे कवी रानकवी तुकाराम धांडे यांची प्रमुख उपस्थिती ठरली. दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या सत्कारानंतर शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना भाषणातून मांडल्या. कार्यक्रमात मुख्याध्यापक आदिनाथ सुतार, डोंगरू बारामते, निसर्गकवी गणेश गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रानकवी तुकाराम धांडे यांनी विविध कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसह अर्चना नाडेकर व वर्षा पोटकुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनार्दन मगर, सुजाता झेंडे, विठ्ठल आडे, सतिश भांगरे, सोनवणे, बोडखे, बाबासाहेब लोंढे, रंजित बागुल, नम्रता शिंदे, लता मेश्राम, सुषमा खाडे, रामदास मडके, विजय खाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी जगदिश बेळगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. समारंभास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार
राजूरमध्ये महिलादिनी ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश
शिस्तीसह हवे वेळेचेही व्यवस्थापन : शेलार

अकोले : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रतनवाडी युनिट–मुतखेल (ता.अकोले, जि.अहिल्यानगर) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी (दि. १३) उत्साहात पार पडला. कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती मोहरे व उपाध्यक्ष विजय इदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 मुतखेल गावच्या सरपंच दीपाली रोंगटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मराठी पुस्तकातील ‘रानवेडी’ व ‘वनवासी’ या कवितांचे कवी रानकवी तुकाराम धांडे यांची प्रमुख उपस्थिती ठरली. दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या सत्कारानंतर शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना भाषणातून मांडल्या. कार्यक्रमात मुख्याध्यापक आदिनाथ सुतार, डोंगरू बारामते, निसर्गकवी गणेश गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रानकवी तुकाराम धांडे यांनी विविध कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसह अर्चना नाडेकर व वर्षा पोटकुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनार्दन मगर, सुजाता झेंडे, विठ्ठल आडे, सतिश भांगरे, सोनवणे, बोडखे, बाबासाहेब लोंढे, रंजित बागुल, नम्रता शिंदे, लता मेश्राम, सुषमा खाडे, रामदास मडके, विजय खाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी जगदिश बेळगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. समारंभास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS