Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहाटेच्या शपथविधीचे कवित्व  

सुमारे तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये बंड करत अजित पवारांनी भाजपची साथ धरली होती. भल्या पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर,

‘वंचित‘चा स्वबळाचा नारा !
संसदेचा आखाडा
राजीनामासत्र आणि सरकारचा दबाव

सुमारे तीन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये बंड करत अजित पवारांनी भाजपची साथ धरली होती. भल्या पहाटे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधीमुळे अनेकांना शरद पवारांनीच भाजपसोबत युती केल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र शरद पवारांनी तत्क्षणी ट्विट करत हा दावा फेटाळला होता. त्यानंतर अजित पवारांचे बंड शमले आणि अजितदादांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. मात्र नेमके काय राजकारण शिजले, अजित पवार भाजपसोबत कसे गेले, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना नेमके काय सांगितले, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, याची कोणतेही उत्तर समोर आले नव्हते. शरद पवारांनी आणि अजित पवारांनी यावर बोलणे टाळणे. तर देवेंद्र फडणवीसांनी देखील योग्य वेळ आल्यावर बोलू, असा इशारा दिला होता. मात्र तीन वर्षानंतर फडणवीसांनी एका वृत्त्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांशी चर्चा केल्यानंतरच पहाटेचा शपथविधी झाल्याचा दावा केला. तर शरद पवारांनी हा दावा फेटाळून लावला असून, असत्याचा आधार घेऊन फडणवीस बोलत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र याबाबतीत अजित पवारच नेमके काय झाले होते, याचा स्पष्ट खुलासा करू शकतील. मध्यंतरी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी खेळलेली खेळी असू शकते, असेे वक्तव्य केले होते. मात्र तरी देखील पवारांनी यावर स्पष्टीकरण देणे टाळले होते.

फडणवीसांनी अचूक वेळी यावर भाष्य करण्याचे कारण म्हणजे, राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीची वेळ आलेली आहे. अशावेळी प्रत्येक पक्ष आपले नव-नवीन अस्त्र बाहेर काढणार आहे, त्यातलाच फडणवीसांचा हा गौप्यस्फोट म्हणावा लागेल.गेल्या तीन वर्षापासून चर्चेत असलेले महाराष्ट्र राज्यातील राजकिय घडामोडीमुळे देशाचे लक्ष केंद्रीत केले आहे. दोन वेळा सरकार पाडण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारपुढे वेगवेगळ्या समस्यांचा डोंगर उभा करण्यात आल्याचे पहावयास मिळाले आहे. आगामी काळात होणारी निवडणूक आणि त्या अनुषंगाने घेण्यात येणार्‍या निर्णयाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर दिले तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे भरभरून कौतुक केल्याने महाविकास आघाडीमध्ये मनसेचाही वाटा असणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात राज ठाकरे यांची आणि आपली ओळख नसल्याचे सांगत आपण त्यांची टिव्हीवरुन प्रसिध्द होणारी प्रभावशाली भाषणे ऐकत असल्याचेही आ. जयंत पाटील यांनी आपल्यावर केलेल्या मिमिक्रीचेही कौतुक केले.महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आले तर मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, राज्यात आगामी काळात होणारी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. त्यात सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट करायचा आमचा प्रयत्न असेल. मुख्यमंत्रीपदाविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, या निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळावर ठरवेल. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आले तर मुख्यमंत्री कोण होणार हे पवार साहेब ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल. जयंत पाटलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे करताना आपली त्यांच्यासोबत ओळख नाही मात्र, आपण त्यांना फक्त टीव्हीवर बघतो. तसेच त्यांनी माझी मिमिक्री चांगली केली असून त्यांची भाषणेही चांगली असल्याची स्तुतीसुमने उधळली. गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे गटाने दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे प्रचाराचे चिन्ह असलेला धनुष्यबाण गोटवला होता. हे शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण पुन्हा खेचून आणण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्धार केला आहे. प्रचारासाठी चिंचवड येथे झालेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले. शिवसेनेने गमावलेले चिन्ह धनुष्यबाण पुन्हा परत आणण्यासाठी प्लॅन सुरु असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. बेईमानीने ज्या महाशक्तीच्या जोरावर महाविकास आघाडीचे सरकार पाडले, त्याच शक्तीच्या जीवावर जोर दाखवणार्‍यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहिर केले आहे. दरम्यासन, पोट निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील वाद आता पुण्याच्या कसब्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याचे समजत शिवाजी महाराजांचा कसबा हा भाजपचाच राहणार असा विश्‍वास भाजपने केला असल्याचेही समोर आले आहे. महाविकास आघाडी प्रचारातही मागे पडल्याने पोटनिवडणकीत आगामी निवडणूकीची बिजे रोवली असल्याचेही भाजपकडून सांगण्यात येत आहे.

COMMENTS