नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार 8 जुलै रोजी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौर्यासाठी रवाना झाले आहेत. तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. पं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार 8 जुलै रोजी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौर्यासाठी रवाना झाले आहेत. तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दोन देशांच्या दौर्यावर रवाना होत असताना म्हणाले की, रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या भेटीमुळे भारताला या राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. पुढील तीन दिवसांत मी रशिया आणि ऑस्ट्रियामध्ये असेन. या दोन्ही देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी असेल.
COMMENTS