Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी महिलांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा डाव – पिचड

बालविकास कार्यालयाकडून पेसा कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न

अकोले प्रतिनिधी - तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयाचा पारदर्शक कारभार होत नसून पेसा कायद्याचा चुकीचा अर्थ काढून स्थानिक आदिवासी महिलांना रोज

शासनाचा नाकर्तेपणा, आठ महिन्यांपासून उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
मनपा लसीकरणाचा झाला बट्ट्याबोळ, नगरकरांना धरले जाते वेठीस
अंगणवाडी सेविकांचे राज्यस्तरीय आंदोलन

अकोले प्रतिनिधी – तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयाचा पारदर्शक कारभार होत नसून पेसा कायद्याचा चुकीचा अर्थ काढून स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार पासून वंचित करण्यात येत आहे. लव्हाल वाडी, पाचनई, येथील अंगणवाडी गेल्या सहा महिन्यांपासून बंद असून, बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष्य केले जात आहे. अमृत आहार, पूरक आहार यांच्या नियोजनात त्रुटी असल्याने आदिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने माजी आमदार व भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राजूर येथील प्रकल्प कार्यालयात जाऊन संबधित कर्याल्याविरोधात वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांची भेट घेऊन तक्रार केली.


खडकी खुर्द, धामनवन व अन्य दोन ठिकाणच्या अंगणवाडी सेविका भरती बाबत सरपंच व ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता आर्थिक व्यवहार करून ग्रामसेवक यांना हाताशी धरून गुणवत्तेत बसत नसताना भरतीचे आदेश दिले. या भरती प्रक्रिया सदोष असून तिला धामण वन व खडकी खुर्द येथील रेश्मा भांगरे, करवंदे हिराबाई व ग्रामस्थांनी आक्षेप घेत प्रक्रिया स्थगतीचा अर्ज दिला. तर लव्हाल वाडी, पाचनई येथील अंगणवाडी गेली सहा महिन्यापासून बंद असून प्रकल्प अधिकारी याकडे लक्ष्य देत नसून कुपोषणाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. तातडीने अंगणवाडी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. राजूर प्रकल्प अंतर्गत बालक तपासणी साठी तीन फिरते पथक असून प्रकल्प कार्यालय व फिरती पथके यांच्या मध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. प्रकल्प कार्यालय स्याम 74 म्याम 551 तर तालुका आरोग्य विभाग स्याम 57 म्याम 350  बालके असल्याचे दिसून आले. प्रकल्प कार्यालयात अमृत आहार, तीव्र कुपोषित,अती तीव्र कुपोषित याचे चार्ट  कार्यालयात लावण्यात आले नाही. त्यामुळे कुपोषण कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.याबाबत माजी आमदार यांनी संबंधितांची कान उघडणी केली व कारभार सुधारणा करावी असे सांगितले यावेळी त्यांच्या समवेत भारत घाणे,राम तळेकर,बाळासाहेब सावंत, डॉ.अनंत घाणे,गंगाराम धिंदळे ,सरपंच श्रावण भांगरे,नव नाथ करवंदे,रेश्मा भांगरे,देविदास शेलार, उपस्थित होते. तर  जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी मनोज ससे,प्रकल्प अधिकारी हरके,भारती सातळकर यांनी उत्तरे दिली. मनोज ससे (जिल्हा बालविकास अधिकारी) माजी आमदार वैभव पिचड व आदिवासी ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल लव्हाळ वाडी येथे सोमवार पासून अंगणवाडी सुरू करण्यात येईल तसेच भरती प्रक्रिये बाबत चौकशी केली जाईल.

अन्यथा आंदोलन तीव्र करून जाब विचारु
माजी आमदार वैभव पिचड यानी तीव्र व अतितीव्र कुपोषित बालकांची आकडेवारी आरोग्य विभाग व प्रकल्प कार्यालय यांच्या आकडेवारीत तफावत असून, भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवून आदिवासींच्या पेसा कायद्यास छेद देण्याचे काम बालविकास प्रकल्प कार्यालय करत असून त्यात सुधारणा न झाल्यास पेसा सरपंच परिषद याविरोधात तीव्र आंदोलन करून जाब विचारू असा इशारा वैभव पिचड यानी दिला.

COMMENTS