साई खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातुन बेलापूर ला तातडीने  कोविड सेंटर चालू करावे : प्रफुल्ल डावरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातुन बेलापूर ला तातडीने कोविड सेंटर चालू करावे : प्रफुल्ल डावरे

भाजप,शिवसेना रिपाई व मिञ पक्षांच्या सहकार्याने निवडून आलेल्या खा.

लोकसहभागातून स्वतंत्र विलिनीकरण केंद्र कोरोना नियंत्रणासाठी वरदान ठरतील-घोडके
पोलिस अधिकार्‍याकडून मारहाण… उपोषणाचा इशारा
Ahmednagar : दरोडे टाकून लूटमार करणारी टोळी गजाआड (Video)

बेलापूरः भाजप,शिवसेना  रिपाई व मिञ पक्षांच्या सहकार्याने निवडून आलेल्या खा.सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्यासाई खेमानंद फौंडेशनच्या वतीने तातडीने कोविड सेंटर सुरु करुन बेलापूर पंचक्रोशीतील जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन श्रीरामपूर तालुका भाजपचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे यांनी केले आहे. 

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात श्री.डावरे यांनी म्हटले आहे की खा.सदाशिव लोखंडे यांनीलोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांचे साई घेमानंद फौंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याचे आश्वासन दिले होते.त्यांनी दिलेले आश्वासन साई खेमानंद फौंडेशनच्या उंबरगाव येथील दाट लोकवस्तीपासून दूर असलेल्या इमारतीत कोविड सेंटर सुरु करुन पूर्ण करावे. सध्या बेलापूर आणि पंचक्रोशीत कोरोना रोगाने थैमान घातले आहे.श्रीरामपूर येथील रुग्णालयात बेडस् उपलब्ध नाहित.त्यामुळे औषाधोपचार मिळत नाहित.बेलापूर परिसरातील नागरिक यामुळे हवालदिल झाले आहेत.आशास्थितीत खा.लोखंडे यांनी जनतेसाच्या मदतीला धावून येवून दिलासा द्यावा.त्यांचे चिरंजीव डाॕक्टर आहेत.त्यांचीहा मदत होईल त्यामुळे उंबरगाव येथील साई खेमानंदच्या ईमारतीत कोविड सेंटर सुरु करुन खा.लोखंडे यांनी निवडणुकी दरम्यन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी असे आवाहन श्री.डावरे यांनी केले आहे 

COMMENTS