Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले पाहिजे – नितीन गडकरी 

बुलढाणा प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या आत्ये बहिणीकडे सांत्वन पर भेट दिली आह

डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारापूर्वी आढळले जिवंत
पश्‍चिम बंगालमध्ये वंदे भारत रेल्वेवर दगडफेक
अशी वक्तव्य लोकं ऐकतात, हसतात आणि सोडून देतात

बुलढाणा प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या आत्ये बहिणीकडे सांत्वन पर भेट दिली आहे. गडकरी यांनी राबवलेल्या बुलढाणा पॅटर्न चा आवर्जून उल्लेख केला.बुलढाणा जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांचा खोलीकरण करण्यात आलं आहे.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा – अजिंठा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हिरवळ निर्माण झाली आहे. जमिनीमध्ये जिरलेल्या पाण्यामुळे येथील धनगर बांधवांना स्थलांतर करण्याची यंदा गरज पडली नाही. मात्र अजूनही पाणी जमिनीत जिरण्याकरिता मोठे प्रयत्न होण्याची गरज असल्याचे नितीन गडकरींनी बोलून दाखवले .अजूनही येताना बराचश्या भागामध्ये पाहिजे त्या प्रमाणात काम झालं नसल्याची खंतही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

COMMENTS