Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीच्या वाढदिवशी आंब्याच्या झाडांची लागवड

शहरटाकळीच्या पंडित कुटुंबाचा पर्यावरणपूरक उपक्रम

शेवगाव तालुका ः मुलीच्या नवव्या वाढदिवसानिमित्त आपल्या शेत जमिनीत आंब्याची झाडे लावून त्यांची वाढ होईपर्यंत संगोपन करण्याची अनोखी संकल्पना शहरटाक

पवार- विखें यांच्यातील राजकीय वैर तिसरी पिढी संपविणार का?
श्रीराम साधना आश्रमामध्ये पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा
दृष्काळसदृष्य परिस्थितीचे सावट जाऊन भरपूर पाऊस होऊ दे.

शेवगाव तालुका ः मुलीच्या नवव्या वाढदिवसानिमित्त आपल्या शेत जमिनीत आंब्याची झाडे लावून त्यांची वाढ होईपर्यंत संगोपन करण्याची अनोखी संकल्पना शहरटाकळी येथील पंकज पंडित व त्यांच्या कुटुंबाने हाती घेतली आहे.फळांचा राजा असलेल्या आंबा झाडांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून, सावलीसाठी मोठे वृक्ष नसल्यामुळे त्यांनी आंब्याच्या झाडांमुळे  सावली बरोबर फळे सुध्दा मिळणार असल्याने आंबा या वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून मुलीच्या वाढदिनाची आठवण राहील व पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांना दिला आहे.
       सध्या लहान मुलाचे वाढदिवस असल्यावर हॉटेलमध्ये निरनिराळे कार्यक्रम, थोरमोठ्यांना जेवण असा थाटमाट केला जातो. परंतु पंडित यांनी मुलगी ’पूर्वा’ चा नवव्या वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक करण्याच्या संकल्पने साजरा केला.आपल्या स्वतःच्या शेतात आंब्यासह इतर कुठलेही झाडे नसल्यामुळे शेतामध्ये बसण्यासाठी सावली सुद्धा नाही. त्यामुळे मुलीचा वाढदिवसाचे निमित्त साधून आंब्याच्या झाडाची लागवड केली. या कार्यक्रमाला पंडित कुटुंबीय पंकज पंडित, प्रतिभा पंडित मुलगा प्रनव, मुलगी, पूर्वा, सोबतच नागेबाबा वेलनेस फॅमिलीचे सदस्य संभाजीनगर येथील योगेश वाकचौरे , संतोष कळमकर, रूपाली वाघचौरे, अरुणा कळमकर,शहरटाकळी येथील गायत्री भालेराव, दशरथ शेळके, निकिता पानकर, सविता पानकर आदी उपस्थित होते. पूर्वाच्या वाढदिवसाचा केकही झाडाच्या प्रतिकृतीत बनवला होता. पंकज पंडित यांच्या या उपक्रमामुळे वाढदिवसही साजरा झाला आणि पर्यावरण पूरक उपक्रमही राबवला गेल्यान शहरटाकळीसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रत्येकाने आयुष्यात एक झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धेअधिक प्रश्‍न सुटतील. अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल  राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझे सर्वांना कळकळीचे आवाहन आहे, जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड लावा अन् त्याचा सांभाळ करा.
पंकज पंडित, शहरटाकळी

COMMENTS