Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायमोह कृषी मं.तील पीके करपली:अग्रीम मंजूर करा- शिवराम राऊत

शिरूर प्रतिनिधी - शिरूर तालुक्यातील रायमोह मंडळातील खरीप हं. मुग, सोयाबीन, उडीद, कपाशी,तुर हे करपण्याच्या अवस्थेत आहे.कृषिमंडळात पेरणी नंतर दमदार

देशाचे पंतप्रधान सुरक्षित नाही ही दुर्दैवी बाब – चित्रा वाघ | LOKNews24
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण

शिरूर प्रतिनिधी – शिरूर तालुक्यातील रायमोह मंडळातील खरीप हं. मुग, सोयाबीन, उडीद, कपाशी,तुर हे करपण्याच्या अवस्थेत आहे.कृषिमंडळात पेरणी नंतर दमदार पाऊस पडला नसल्याने व कुठेतरी थोडीशी भूरभर आल्याने शासनाच्या 21 दिवसाचा खंड हा निकष पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करून पीक सर्वेक्षण नाकारले त्या मुळे अग्रीमपीकविमा मिळण्यासाठी समस्या निर्माण झाल्यने शिवसंग्राम शिरूर च्या वतीने श्री.शिवराम राऊत यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन रायमोह मंडळातील पीके करपली आहेत.पंरतू पर्जन्यमापक यंत्राचे व 4 मी.मी.पावसाचे कारण देत विमा व शासनाच्या माध्यमातून मिळणार्‍या लाभापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहे.
करिता कालबाह्य निकषावर सर्वेक्षण न करता महसुली व कृषियंत्रने कडून गावनिहाय नमुना पीक सर्वेक्षण करून पावसाअभावी शेतकर्‍यांना झालेला खर्च तरी शासनाच्या व पीकविमा मंजूरी तून मिळून काहिसा दिलासा देण्यासाठी सहकार्य करावे.पर्जन्यमापक यंत्राच्या अनेक त्रुटी आहेत.मंडळातील पर्जन्यमान हा निकष आता कालबाह्य होत आहे.पर्जन्मान असंतुलनामुळे शिवारा-शिवारात पावसात बदल होतो.तर मंडळातील सर्व गावांमध्ये समान पाऊस हा निकष घातक आहे.या साठी ना.कृषिमंत्री श्री.धंनजयजी मुंडे यांच्याकडे हि निवेदन करण्यात आले आहे.तरी शासन यावर सकारात्मक विचार करेल.अवघ्या जिल्ह्यातील परिस्थिती दुष्काळ सदृश्य झाली आहे.तरी शासन रायमोह मंडळातील शेतकर्‍यांवर अन्यय होऊ देणार नाही.असेही व्यक्त केले.या साठी रायमोह मंडळातील शेतकर्‍यांना संघटित होऊन आपला हक्क मिळवला पाहिजे परिसरातील राजकीय पुढारी याविषयी अनभिज्ञ आहेत.तरी शिवसंग्राम शिरूर शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करेल.

COMMENTS