लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुका या देशातील सर्व विरोधी पक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या झाल्या असून, यात आता बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांना
लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुका या देशातील सर्व विरोधी पक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या झाल्या असून, यात आता बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जर विरोधी पक्ष आघाडी स्विकारत असेल तर बहुजन समाज पार्टीही या राष्ट्रीय आघाडीत – जी भाजपाविरोधी असेल – तिच्यात सामील होईल, असं वक्तव्य बसपाचे राष्ट्रीय प्रवक्ते धर्मवीर चौधरी यांनी आज केले. नुकतेच दिल्ली येथे देवीलाल यांच्या राष्ट्रीय लोक दलाच्या रॅली सामील झालेले नितिश कुमार, शरद पवार, सिताराम येचुरी याबरोबरच अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लावलेली हजेरी आणि त्यात विरोधी आघाडी निर्माण करण्याचे दिलेले संकेत हे पाहता देशातील सर्वच छोटे – मोठे राजकीय पक्ष अशा प्रकारच्या आघाडीत सामील होतील, असे वातावरण निर्माण झाले. मात्र अशा प्रकारच्या आघाडीत सामील होण्यापासून दोन पक्ष अलिप्त राहण्याची शक्यता बहुदा बहुतेक राजकीय पक्षांच्या मनात घर करून आहे. त्यातील आम आदमी पार्टीचे केजरीवाल आणि बहुजन समाज पार्टीच्या मायावती. हे बहुदा अशा आघाडी पासून लांब राहतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्याकडून अशा प्रकारचे वक्तव येणे, म्हणजे सक्षम पंतप्रधान मोदींच्या विरोधात एक तुणतुणे वाजण्या सारखे आहे. नितिशकुमार यांनी भाजपाशी आघाडी मोडल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधी आघाडी बनविण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. मात्र, त्याच वेळी आपण कोणत्याही प्रकारे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही किंवा पंतप्रधान पदाचे उमेदवार आपण नाहीत, असा खुलासाही त्यांनी २६ सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या रॅलीत बोलताना केला होता. अर्थात नितीश कुमार यांनी स्वतःला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून आपण नसल्याचे सांगितले असले तरी, त्यांच्या बाबतीत देशात मात्र तशा प्रकारचा विचार केला जातोय. परंतु, आता २०२४ च्या निवडणुकीत एक सशक्त राष्ट्रीय आघाडी तयार होण्याच्या गरजेचे त्यांनी प्रतिपादन केले होते. अशा आघाडीचा जन्म होण्यापूर्वीच पंतप्रधान पदाच्या उमेदवारी संदर्भात येणारी वक्तव्य हास्यास्पद आहेत. मायावती या एकूणच राष्ट्रीय राजकारणातील अशा नेत्या आहेत ज्यांनी चार वेळा उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठा राज्याचे मुख्यमंत्री पदाचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय राजकारणात त्यांची स्वतंत्र अशी भूमिका आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात एकूण मतांच्या टक्केवारीत जर आपण पाहिले तर आतापावेतो त्यांचे स्वतंत्रपणे उत्तर प्रदेशात २१ ते २४ टक्के पर्यंत त्यांचे मतदार आहेत. अर्थात गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच बहुजन समाज पार्टीच्या एकूण मतांच्या टक्केवारीत घट झालेली दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात केलैली घोडदौड सपा-बसपाला एकत्र येऊनही भुईसपाट करून गेली.. मायावती यांचे नेतृत्व मोदींना पर्याय असू शकत नाही! मोदींच्या नेतृत्वामुळेच विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या एकूण मतांच्या टक्केवारीत घट झाल्याचे आपल्याला दिसते. पण आज ज्या पद्धतीने बहुजन समाज पक्षाकडून मायावती यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून विरोधी पक्षांच्या आघाडीने स्वीकारावे, असा प्रस्ताव आला, तेव्हा अशा संधीसाधू राजकारणाविषयी वीट येतो. नितीश कुमार आणि मायावती यांचे प्रस्ताव स्वतः पुरते मर्यादित राहणारे आहेत. त्यामुळे, असे प्रस्ताव व्यापक हिताचे नाहीत. सध्यातरी, या मंडळींची वक्तव्ये म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला, या प्रकालचीच आहेत.
COMMENTS