Homeताज्या बातम्यादेश

विरोधी नेत्यांना फोन हॅकचे संदेश ?

अ‍ॅपल कंपनीने दिला सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली ः इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांसह, काही पत्रकारांना देखील केंद्र सरकार आपला फोन हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सावधानतेचा संद

बाभळगावमध्ये फुले-आंबेडकरी युवा संमेलन !
दोन दिवसात संपणार पुण्यातील लसींचा साठा
श्रद्धा धाडीवाल या मुलीने रेखाटली जिवंत रांगोळी

नवी दिल्ली ः इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांसह, काही पत्रकारांना देखील केंद्र सरकार आपला फोन हॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सावधानतेचा संदेश अ‍ॅपल कंपनीकडून काही नेत्यांना पाठविण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कंपनीने आपल्या संदेशात म्हटले आहे की, कदाचित राज्य पुरस्कृत हल्लेखोर तुमचे आयफोन हॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे काही करत आहात, त्यामुळे हे हल्लेखोर तुमचे फोन हॅक करण्याची शक्यता आहे, असे मेसेज या नेत्यांना पाठवण्यात आले आहेत.

यामध्ये महुआ मोईत्रा, काँग्रेस खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आदींचा समावेश आहे. या नेत्यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सध्या ‘कॅश फॉर क्वेश्‍चन’ प्रकरणात आरोप होत आहेत. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच महुआ मोईत्रांनी मंगळवारी सकाळी अ‍ॅपलकडून आलेला इशारा देणारा संदेश पोस्ट केला. महुआ मोईत्रा या आयफोन वापरत असून सरकार पुरस्कृत हॅकर्सकडून आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा हा इशारा होता. असाच संदेश काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेरा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनाही आले आहेत. प्रियांका चतुर्वेदींनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हा मेसेज सविस्तर दिल्याचे दिसत आहे. अ‍ॅलर्ट, सरकार पुरस्कृत हल्लेखोर कदाचित तुमचा फोन हॅक करत आहेत. आम्हाला अशी शक्यता वाटत आहे. आम्हाला वाटतंय की तुमच्या अ‍ॅपल आयडीशी संलग्न आयफोन त्रयस्थ ठिकाणी बसून हॅक करण्याचे प्रयत्न सरकारकडून मदत मिळणारे हॅकर्स करत आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे करता, त्यामुळे तुमचे फोन हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत. जर हे हल्लेखोर यशस्वी झाले, तर ते कुठेही बसून तुमच्या फोनमधील संवेदनशील माहिती, संदेश किंवा अगदी कॅमेरा आणि मायक्रोफोनशीही छेडछाड करू शकतात. अर्थात, हेही शक्य आहे की हा अ‍ॅलर्ट चुकीचा असेल. पण तो गांभीर्याने घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे, अंसे या संदेशात नमूद करण्यात आले आहे.

फोन टॅप करा, मला फरक पडत नाही ः राहुल गांधी – राजा हा राजा नाही, त्याच्या हातात ताकद राहिली नाही. आम्ही जेव्हा अदानी यांच्यावर टीका करतो, तेव्हा आमच्यावर धाडी टाकण्यासाठी गुप्तचर यंत्रणा, गृप्तहेर, सीबीआयला सोडले जाते. आता अदानी एक नंबर आहे तर दोन नंबरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि तिसर्‍या नंबरवर अमित शाह असल्याची टीका राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केली. वेणुगोपाल, पवन खेरा, सीताराम येचुरी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी, महुआ मोइत्रा, राघव चढ्ढा, अखिलेश यादव, या सर्वांना अ‍ॅपलकडून मेसेज आली. या सर्वांनी गौतम अदानीविरोधात आवाज उठवला. संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर अदानी ग्रुपला दिली. परंतु कितीही टॅपिंग करा, मला फरक पडत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला.

COMMENTS