https://youtu.be/0ckc6jGdRxM?si=4XnUHToevSSwIS0a कानपूर : कानपूरमधील हायवेवर आज एका पेट्रोल टँकरचा भीषण अपघात झाला. टँकर अनियंत्रित होऊन रस्त्या
कानपूर : कानपूरमधील हायवेवर आज एका पेट्रोल टँकरचा भीषण अपघात झाला. टँकर अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटला, ज्यामुळे टँकरमधील हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात पसरले.
या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी एकच गर्दी केली. विशेष म्हणजे, नागरिक आपल्यासोबत डबे, बाटल्या आणि जे काही भांडे मिळेल ते घेऊन आले होते. रस्त्यावर वाहणारे पेट्रोल भरण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली.

COMMENTS