Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ६ रुपयांची कपात

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. यामुळे जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडू लागले आहेत.

अमेरिका-इराण शांतता चर्चेला वेग; कायमस्वरूपी कराराबाबत अद्याप प्रतीक्षा
शाळा आणि मुलांवरील हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावीसंयुक्त राष्ट्रसंघात भारतीय राजदूतांनी मांडली ठाम भूमिका
व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार; संशयित ठार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित
Pakistan Petrol Prices Cut; Diesel Rates Slashed 2026

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. यामुळे जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडू लागले आहेत. भारताने देखील दरवाढीबाबत हळूहळू सामान्यांच्या खिशाला हात घालायला सुरुवात केली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे भारताचा शेजारी पाकिस्ताने उलटा डाव टाकला आहे. त्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्याऐवजी स्वस्त केले. शुक्रवारी पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर ६ रुपये कपात केली. तर हाय स्पीड डिझेलच्या प्रति लीटर किमतीत ६.८० पैशांची कपात केली आहे.

नवीन नोटिफिकेशननंतर पेट्रोलची किंमत ही ४०३.७८ रुपये प्रति लीटर आणि हाय स्पीड डिझेलची किंमत ४०२.७८ रुपये प्रति लीटर झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानाने सलग दुसऱ्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे. मात्र भारताने आठवडाभरात तीन वेळा दरवाढ केली.

COMMENTS