Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीईएसचे अध्यक्ष रामदास आठवले ; राज्य सरकारचे शिक्कामोर्तब

आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका
 समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार
इम्तियाज जलील यांचे औरंगाबाद शहर नामांतराविरोधात साखळी उपोषण
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड अधिकृत असल्याचा निकाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाने यापूर्वीच दोन वेळा दिलेला आहे. या निर्णयास मागील 12 वर्षात कुठेही कायदेशीर आडकाठी आलेली नाही. कोणत्याही न्यायालयात या अध्यक्ष पदास आव्हान देण्यात आलेले नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दोन वेळा रामदास आठवले यांच्या बाजुने दिलेला निकाल ग्राह्य मानून राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे पिपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणून रामदास आठवले यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष रामदास आठवले असून त्यांच्या अध्यक्षतेत पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे कामकाज अधिकृत चालले आहे. रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून शिफारसी करतील, त्या शिफारसी अनधिकृत असल्याने स्विकारू नयेत. या बाबतचे पत्र राज्य शासनाने सर्व विद्यापीठांना पाठवले आहे. याबाबतची माहिती आज रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. गरवारे क्लब येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशी आहे कार्यकारणी
मंत्री रामदास आठवले हे पी.इ.एसचे अध्यक्ष आहेत. याशिवाय आठवले यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, विश्‍वस्त सदस्यपदी पद्मश्री ऍड. उज्जवल निकम, जस्टीस सुरेंद्र तावडे, ऍड. बाबुराव बर्वे, डॉ. वासुदेव गाडे, डॉ. सुनिल खापरडे, अरविंद सोनटक्के, प्रो.एस.एल भागवत, डॉ.एम.व्यंकट स्वामी तर सचिवपदी डॉ.वामन आचार्य आहेत, अशी कार्यकारणी कार्यरत आहे.

COMMENTS