Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या पोलिसांचे कायम स्वरुपी निलंबन करावे ; इस्लामपूर भाजपा शहर युवामोर्चाची मागणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात मध्यरात्री घुसून विद्यार्थ्य

वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून तरास नैसर्गिक अधिवासात
सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय आज होणार
आर्थिक शोषण करणार्‍यांना निवडणुकीत परिवर्तन करून धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात मध्यरात्री घुसून विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणार्‍या पोलिसांचे कायम स्वरुपी निलंबन करण्यात यावे, अशी मागणी इस्लामपूर भाजपा शहर युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
9 मार्च रोजी शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात अचानक मध्यरात्री पोलिस शिरले,दरवाज्यावर लाथा घालुन दरवाजे उघडुन वस्तीगृहातील वास्तव्यास असणार्या विद्यार्थ्याना मारहाण करण्यास सुरुवात केली.या घटनेचा निषेध इस्लामपुर भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी केला. या विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या पोलिसांची सेवेतून कायमस्वरुपी निलंबित करण्याची मागणी निवेदनाव्दारे प्रांताधिकारी संपत खिलारी यांच्याकडे केली.
इस्लामपूर भाजपा शहर युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, राज्यातील पोलिसांचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले असून रक्षकच भक्षक बनू लागले आहेत. काही दिवसापूर्वी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील देवकर नामक पोलिसाने तर खाकी वर्दीला काळीमा फासला असे कृत्य केले. अशा घटना नियमित घडत आहेत. पोलिसांच्या भितीपोटी अनेक तक्रारी रेकॉर्डवर येत नाहीत. अशा घटनामुळे पोलीस पुर्णत: बदनाम झाला असून असे गैरकृत्य करणार्‍या पोलिस अधिकारी असो अथवा कर्मचारी असो त्यांना सेवेतून कायमस्वरुपी मुक्त करावे. जेणे करुन पुन्हा-पुन्हा अशा अन्यायाच्या घटना घडणार नाहीत. सध्याचे पोलिसांची कार्यपध्दत पाहीली तर त्याच्याकडे माणुसकी राहीली नाही, अशी मानसिकता सर्वसामान्य नागरीकांची झाली आहे. विकृत कृत्य व अन्याय करणार्‍या पोलिसांचे सेवेतून कायमस्वरुपी निलंबन व्हावे, म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी सांगली, पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे.
यावेळी इस्लामपूर शहर भाजपा अध्यक्ष सतेज पाटील, उपाध्यक्ष, सुयश पाटील, भाजपाचे गौरव खेतमर, अक्षय कोळेकर, अल्ताफ तहसीलदार, सौरभ फल्ले, गणेश दाजी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS