Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणीच्या बागेत दिसणार पेपा पिग आणि माशा अँड द बेअर

मुंबई : हत्ती, वाघ, अस्वल, सिंह, पेंग्विन असलेल्या राणीच्या बागेत लवकरच नवीन पाहुणे येणार आहेत. पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्रीटी आ

नेवासे तालुक्यातील अवैध दारुविक्री जोमात
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न .
तिसरी लाट आटोक्यात, काळजी करण्याचा विषय नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे | LOKNews24

मुंबई : हत्ती, वाघ, अस्वल, सिंह, पेंग्विन असलेल्या राणीच्या बागेत लवकरच नवीन पाहुणे येणार आहेत. पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्रीटी आणि सिल्व्हेस्टर ही मुलांच्या आवडीची कार्टून्स पानाफुलांपासून बागेत साकारली जाणार आहेत. हे प्रदर्शन मुंबईकरांना 3 ते 5 फेब्रुवारीपर्यंत मोफत पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला लहानग्यांसह आजी-आजोबांचाही प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास पालिकेने व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने दरवर्षी राणीच्या बागेत उद्यान प्रदर्शन भरविले जाते. उद्यान प्रदर्शनाचे यंदा 26 वे वर्षे असून 3 फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचे मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या वतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. यंदाच्या उद्यान प्रदर्शनात पाना-फुलांपासून साकारलेल्या जी 20 च्या बोधचिन्हांसह जी 20 देशांमधील भाज्या, झाडे व फुलेही मुंबईकरांना पहायला मिळणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. प्रदर्शनासोबतच येथील दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी खरेदी लहान मुलांच्या भावविश्‍वाचा भाग असणारे कार्टून्स यावर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. याअंतर्गत पानाफुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना- फुलांपासून तयार केलेले अनेक सेल्फी पॉइंट देखील प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत. करण्याची संधीही मुंबईकरांना मिळणार आहे. तसेच उद्यानविद्या विषयक विविध कार्यशाळांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणार्‍या कृष्णवडासारख्या अनेक देशी प्रजातींची झाडे देखील बघता येणार आहेत.

COMMENTS