संगमनेर : स्वराज्य संकल्पकाची भूमी असलेल्या पेमगिरी येथील शहागडासह विविध विकास कामांसाठी आपण सातत्याने निधी दिला. त्या निधीमधून राबवलेल्या विविध व

संगमनेर : स्वराज्य संकल्पकाची भूमी असलेल्या पेमगिरी येथील शहागडासह विविध विकास कामांसाठी आपण सातत्याने निधी दिला. त्या निधीमधून राबवलेल्या विविध विकास कामे पेमगिरी हे आदर्श गाव ठरले असून निळवंडे कालव्याच्या वरील भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याचबरोबर पेमगिरी गावांमध्ये 3 कोटी 28 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण त्यांनी केला.
पेमगिरी येथे पेमगिरी शहागड तटबंदीचे बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, शाळांच्या वर्ग खोल्या, सभागृह,पूल,अंगणवाडी इमारत, सौर दिवे, सोलर प्रकल्प व अभ्यासिकेचे लोकार्पण माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर ऍड.माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, सोमनाथ गोडसे रावसाहेब डूबे यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की पेमगिरी गावच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी दिला मोरदरा धरण ते गावातील विकास काम हे गावच्या विकासात अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. याचबरोबर ऐतिहासिक शहागड व महाकाय वटवृक्षाच्या विकासासाठी ही आपण निधी दिला. सध्या शासन घोषणा करते मात्र त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे.
तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अथक प्रयत्नातून तालुका उभा केला आज संगमनेर तालुका सहकार शिक्षण समाजकारण शेती अशा सर्व क्षेत्रात राज्याला दिशादर्शक आहे. हे काम एका दिवसात नव्हे तर 40 वर्षातील परिश्रमाचे फळ आहे हा तालुका आपल्याला जपायचा असून सर्वांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ गोडसे यांनी केले तर शांताराम डूबे यांनी आभार मानले.

COMMENTS