Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खिर्डी गणेश येथे शांतता समितीची बैठक उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुका पोलिस स्टेशनच्या वतीनेे पोलिस निरीक्षक दौ

कृषिकन्याचे पानसवाडीत शेती मार्गदर्शन
बोठेच्या नगर मुक्कामाचा उलगडा अजून गुलदस्त्यातच ; दोषारोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात
निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज -संजय सपकाळ

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुका पोलिस स्टेशनच्या वतीनेे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सर्व ग्रामस्थ व सर्व पक्षाच्या कार्यकर्ते यांची शांतता समितीची बैठक घेतली.यावेळी नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. याची काळजी घेण्याबरोबरच निवडणुका निर्भयमुक्त पार पाडाव्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार विजयासाठी प्रयत्न करतो.


कायदेशीर मार्गाने प्रचार प्रसार उमेदवारांनी केला पाहिजे. मात्र निवडणुकीत कोणाची तरी जिरवाजिरवीच्या उद्देशाने चिथावणी देणार्‍यांची संख्या जास्त असते. या चिथावणी खोरामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतो. उमेदवार व प्रचार करणार्‍यांनी आपली सभ्यता ढलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निवडणूक शांततेत पार पडली पाहिजे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍यांची गय केली जाणार नाही असेही कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रभारी पोलीस पाटील दादासाहेब शिंदे, माजी पोलिस पाटील बाबासाहेब वराडे सह गावातील आजी, माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांची उपस्थिती होती.

COMMENTS