Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा ः भाजपची मागणी

पाथर्डी ः यंदा पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, खरिपाची पिके जळून गेली आहेत. रब्बीचा हंगाम धोक्यात

सोळाशे कोटी रुपयांचे बेकायदा दगड उत्खनन? : राज्यपालांकडे गायके यांची तक्रार
बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख
दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला’ | LokNews24

पाथर्डी ः यंदा पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, खरिपाची पिके जळून गेली आहेत. रब्बीचा हंगाम धोक्यात असून, तालुक्यात प्रचंड अशी दृष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करावा व सर्व प्रकारच्या दुष्काळी सवलती मिळाव्यात अशी मागणी भाजपच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संपूर्ण पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे आशा घोषणा देत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला असून काही ठिकाणी तर आजिबातच पाऊस झाला नाही. तालुक्यातील सर्वच मंडळातील खरीप पिके पावसाअभावी जळुन गेली आहेत. रब्बीच्या पिकाची तर आजिबात शक्यता नाही. सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व तलाव, नालाबंडिंग, बंधारे, सर्वच पाणवठे, नद्या कोरड्याठक आहेत. विहीरीची पाणी पातळी खोलवर गेली असून तळ गाठला आहे. जून महिन्यापासून पिण्याचे पाण्याचे सुरु असलेले टॅकर सप्टेंबर अखेर पर्यंत सुरु होते. ऑक्टोबरमध्ये पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी सुरु झाली आहे. त्यामुळे पुढील सहा ते आठ महिने तालुक्यातील जनतेला यातीव्र दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. तरी राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा व मागणी नुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर, चारा छावण्या, शेतकर्यांना अनुदान ,नुकसान भरपाई पीक विमा यासह सर्वच दुष्काळी सवलती देण्यात याव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, विष्णुपंत अकोलकर, अमोल गर्जे, अजय भंडारी, अजय रक्ताटे, नारायण पालवे, रवींद्र वायकर, सुनील ओव्हळ, महेश बोरुडे, सचिन पालवे, जगदीश काळे, अँड.चंद्रकांत सातपुते, सुधाकर डांगे, साहेबराव सातपुते, पोपट बडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS