Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थ पवार यांना ’वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा

मुंबई : देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना आणि राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. राज्याचे

कामाचे पैसे न दिल्याने मिस्त्रीने मर्सिडीज पेटवली
हरियाणात आप-काँगे्रसची आघाडी नाहीच
भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज ः मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना आणि राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS