Homeताज्या बातम्यामनोरंजन

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा १३ मे रोजी साखरपुडा करणार

गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण या दोघांनीही त्यांच्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले

आयसीसीकडून विश्‍वचषकाचा सर्वोत्कृष्ट संघ जाहीर
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उद्यापासून मोफत तपासणी शिबीर
संतापजनक

गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण या दोघांनीही त्यांच्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेले नाही. पण त्यातच आता परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे. परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा नुकतंच एकत्र दिल्लीसाठी रवाना झाले. हे दोघेही एकाच गाडीने विमानतळावर पोहोचले होते. त्या दोघांचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यावेळी परिणितीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघव चड्ढा यांनी काळ्या रंगाच्या शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळाले. परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे. येत्या १३ मे रोजी हे दोघेही साखरपुडा करणार असल्याचे बोललं जात आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी केली जात आहे. परिणिती आणि राघव दिल्लीत साखरपुडा करणार आहे. या साखरपुड्यासाठी १५० लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहे. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील. यानंतर छान डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS