Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष वैद्य यांच्या कारला अपघात 

नांदेड प्रतिनिधी - मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष अशोकराव वैद्य यांच्या कारला परभणी जवळ मोठा अपघात होऊन

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण दुर्घटना भर रस्त्यात कारला लागली आग.
कार आणि बाईकचा भीषण अपघात.
पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.

नांदेड प्रतिनिधी – मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष अशोकराव वैद्य यांच्या कारला परभणी जवळ मोठा अपघात होऊन पतीपत्नी मृतू पावले आहेत तर या अपघातात त्यांचा सहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. ही घटना परभणी तालुक्यातील भारस्वाडा टी-पॉइंटजवळ शनिवारी दुपारी घडली. त्याव्च्या मुलावर नांदेड येथील अपेक्षा हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
येत्या 30 मे रोजी आशिष वैद्य यांच्या मेव्हण्याचे लग्न होते. या लग्नासाठी ते नांदेडला येत होते. आशिष वैद्य हे त्यांच्या पत्नी प्रतिभा आशिष वैद्य (33) व मुलगा सात्विक वैद्य (सहा) हे कार क्र. (एमएच 12 यूएस 7564) ने पुणे येथून नांदेडकडे येत असताना शनिवारी परभणी पासून जावळच भारस्वाडाच्या पुढे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार ही लिंबाच्या झाडावर आदळली. यात हे दाम्पत्यमरण पावले झाले. नांदेड येथील येशनगरी (फेस दोन) मधील रहिवाशी अशोकराव वैद्य (असर्जनकर) यांचे आशिष वैद्य हे जेष्ठ चिरंजीव व प्रतिभा हि सुन होत.  त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता गोवर्धन घाटावर मयत पतीपत्नीवर अंतिम संस्कार करण्यात आले. साश्रूनयनाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.  मोर चौक भागातील यशनगरी फेस 2 येथून अंतिम यात्रा काढण्यात आली. या यात्रेत माजी उपमहापौर विनय गिरडे पाटील,माजी नगरसेवक राजू काळे,जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,माजी कृषी अधिकारी के.डी.पवार,कृषी विद्यापिठाचे माजी संचालक डॉ एन डी पवार,तुकाराम मोरे,भगवान मोरे,बळीराम पाटील-पवार, राजू हंबर्डे,माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे,माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंदे,संतोष कदम वाडीकर ,व्यंकटी पांचाळ विष्णुपुरी,प्रभाकरराव मुंगल ईजळी,शिवाजीराव देशमुख भायेगाव, बाबुराव पाटील नरवाडे,किशनराव पाटील भद्रसाळ,रामराव पाटील नरवाडे भद्रसाळ,मारोती पाटील चव्हाण,डॉ. विष्णुदास बागल पिंपळगावदतराम पाटील आगलावे सरपंच जवळा (के),बाबुराव अमृतराव पाटील सूर्यवंशी जवळा (के) लक्ष्मणराव आगलावे गुरुजी हे सहभागी झाले होते. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी वैद्य कुटुंबावर कोसळलेल्या संकटाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

COMMENTS