पालक-पाल्यांनो ऑनलाईन चा आग्रह धरू नका!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पालक-पाल्यांनो ऑनलाईन चा आग्रह धरू नका!

महाराष्ट्रात दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्या, अशी मागणी करित विद्यार्थ्यांनी नुकतेच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवा

सह्याद्री संस्थेने गुणवत्तेचा लौकिक कायम जपला
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा
राज्यातील ‘हे’ 14 जिल्हे झाले अनलॉक | LOKNews24

महाराष्ट्रात दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्या, अशी मागणी करित विद्यार्थ्यांनी नुकतेच राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालून काहीसं हिंसक स्वरूपाचं आंदोलन विद्यार्थ्यांनी केले. मात्र, गेली दोन वर्षे शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वस्तुस्थिती अशी आहे की, कोणताही विद्यार्थी कोणाला ओळखत नाही. असे असताना अचानक काही शेकडा विद्यार्थी एकत्र येतात, आणि एकाच हेतुने प्रेरित होऊन आंदोलन करतात, त्या आंदोलनाचे स्वरूप हिंसक आंदोलन करतात यामागे एक शिस्तबद्ध असे षडयंत्र असल्याचे त्याचक्षणी अनेकांच्या लक्षात आले होते. परंतु, यावर पोलिस तपास होऊन काही तथ्ये समोर आलीच. या तथ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, विद्यार्थ्यांना भडकविण्यातही संघाचा प्रत्यक्षात प्रत्यक्ष कसा सहभाग आहे, हे तथाकथित हिंदुस्थानी भाऊच्या अटकेने सिध्द झाली. मात्र या आंदोलनात जी मागणी केली गेली त्याच्या विरोधात राज्य सरकारचा निर्णय होईल असे संकेत आता मिळाले आहेत. काल राष्ट्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा शिक्षण ऑनलाइन  करण्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. ऑनलाईन शिक्षण हे बहुजन समाजाला शिक्षणातून बाहेर करण्याचे षडयंत्र आहे. अशा षडयंत्राला महाविकास आघाडी सरकारने हाणून पाडले पाहिजे, अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. दहावी-बारावीच्या परिक्षा ऑफलाईन घेण्याचा महाराष्ट्र सरकारच्या संकल्पाचे म्हणून आम्ही स्वागत करतो.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वांच्या मनात धडकी भरवली होती, त्यामुळेच परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी जोर धरत होती. मात्र आताचे लेटेस्ट आकडे पाहिल्यास कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओसरल्याचे दिसतंय आणि गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षा तरी ऑफलाईन घ्याव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. हेच डोळ्यासमोर ठेवून परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ऑनलाईन शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या पोरांनाच परवडू शकते. श्रीमंत वर्गाला आपल्या पाल्यांना महागड डिव्हाईस, चांगले नेटवर्क, स्वतंत्र खोली, अशा बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देता येतात. त्या समोर सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना यातील कोणतीही सुविधा उपलब्ध करून देणे अवघडच नव्हे तर अशक्य ठरते. त्यातही विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र पाहिले तर त्यांना समवयीन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा मानसिक विकास होऊ शकत नाही. सह‌अध्यायींबरोबर संवादाचे आदानप्रदान झाल्याशिवाय शिक्षण योग्यरित्या होवूच शकत नाही. उच्चजातीयांना ही अडचण नाही. कारण त्यांची मुले आता इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेताहेत. त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि संधी यांची तुलना सामान्य भारतीयांच्या पाल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांशी होवू शकत नाही. तथाकथित कोणी हिंदूस्थानी भाऊ हा अगदी कोवळ्या वयाच्या म्हणजे कुमार वयाच्या बहुजन मुलांना भडकावून ऑनलाइन परिक्षा घेण्याचे आंदोलन करून बहुजन विद्यार्थ्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हेतू, म्हणजे फारच दुष्ट हेतू म्हणावा लागेल.परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी आंदोलनावेळी करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच हजारो विद्यार्थी अचानक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमले होते, त्यांतर या विद्यार्थ्यांचा मोठा उद्रेक झाल्यचे पाहायला मिळाले. त्यानंतर परीक्षांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वसन शिक्षमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते, त्यामुळे परीक्षांचं काय होणार? परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार? असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाला. परंतु, परिक्षा या ऑफलाईन च होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. बहुजन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी एक बाब लक्षात घ्यावी की,  ऑनलाईन परिक्षांचा आग्रह धरू नका. ही बाब तुमच्या पाल्यांच आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरेल

COMMENTS