Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी नागपूरमध्ये पेपर

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. मात्

साहेबांनी तालुका राज्यात अग्रेसर ठेवला : प्रतीक पाटील
थंडीच्या काळात लहान मुलांतील श्‍वसनविकार बळावण्याचा धोका
शासकीय वसतिगृहात बाल लैंगिक अत्याचाराबाबत समुपदेशन कार्यक्रम

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. मात्र, औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा दि. 21 व 26 डिसेंबर रोजी होत असून परीक्षार्थींना सातारा सोडून राज्यातील मुंबई, नागपूर, नांदेड अशी केंद्रे आल्याने परीक्षार्थी उमेदवारांची राज्यभर फरफट सुरू आहे. त्यांना प्रवासाचा आर्थिक फटका बसणार असल्यामुळे बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याच्या संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागावले होते. त्यानुसार काही संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या. काही संवर्गाच्या परीक्षा अद्यापही सुरू आहेत. त्यानुसार औषध निर्माण अधिकारी या पदाची परीक्षा दि.21 व 26 डिसेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना हॉल तिकीट आले आहे. संंबंधित उमेदवारांना परीक्षा केंद्र मुंबई येथे आले आहे. परीक्षार्थी उमेदवार सातारचा रहिवासी असून त्याने सातारा जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकारी पदासाठी अर्ज केले असताना त्याचे परीक्षा केंद्र मुंबई आले आहे. तसेच काहींना नांदेड, नागपूर, औरंगाबाद अशी परीक्षा केंद्रे आली असल्याने संबंधित परीक्षा घेणार्‍या यंत्रणेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
तसेच विविध संवर्गाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क 1 हजार रुपये आकारण्यात आले आहेत. त्यात मुंबईला परीक्षा केंद्र आल्याने परीक्षार्थी उमेदवारांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक उमेदवारांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. याबाबत प्रशासनाने काही तरी मार्ग काढावा, अशी मागणी परीक्षार्थी उमेदवारांमधून होत आहे.

COMMENTS