Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पनवेल-स्वारगेट बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

पनवेल ः पनवेल मधील खांदा कॉलनी जवळ प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात जवळपास 15 ते 2

सासऱ्याला बस स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना ट्रकने सूनेला चिरडले.
समृद्धी महामार्गावरील अपघातात 15 प्रवासी जखमी
कुमठा खुर्द येथे बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

पनवेल ः पनवेल मधील खांदा कॉलनी जवळ प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात जवळपास 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीनूसार एसटी बस जव्हार वरून स्वारगेटला निघाली होती. बस खांदा कॉलनी जवळ आली असता एका वाहनाला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाशांना एमजीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS