Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पंकजा मुंडेंनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

महाशिवरात्री निमित्त परळीत शिवभक्तांची मांदियाळी

बीड प्रतिनिधी - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घ

 छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरून बुलढाण्यात आली धर्मवीर ज्वाला
कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त
सातार्‍यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी

बीड प्रतिनिधी – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळीच पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवरील संकट दूर करून सर्वांच्या सुखाची  प्रार्थना त्यांनी यावेळी केली. वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. पंकजा मुंडे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात जमा झालेल्या महिला, युवक, युवती आणि सर्व सामान्य नागरिकांनी त्यांचसोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गराडा घातला. सेल्फीसाठी प्रत्येकांची झुंबड उडाली होती. पंकजांनी देखील यासाठी सर्वांना आवर्जून मनसोक्त वेळ देत सर्वांची इच्छा पूर्ण केली. तसेच भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.3

COMMENTS