Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडे काँगे्रसच्या वाटेवर ?

सोनिया गांधींसह राहुल गांधींची भेट घेतल्याची चर्चा

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे राजकारण ऐन पावसाळ्यात तापले असतांना, आगामी काही दिवसांमध्ये अनेक राजकीय बॉम्ब फुटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

बहुजन संस्कृतीवर आर्य संस्कृतीची झालर !
सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून
माळढोक संपवण्यामध्ये अजित पवार, बबनराव पाचपुते मुख्य सूत्रधार

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे राजकारण ऐन पावसाळ्यात तापले असतांना, आगामी काही दिवसांमध्ये अनेक राजकीय बॉम्ब फुटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याची स्पर्धा वाढत असतांना, दुसरीकडे भाजपमध्ये नाराजांची संख्या देखील वाढत चालली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पक्षाने त्यांचे पुनवर्सन करण्याऐवजी त्यांना राज्याच्या राजकारणातून कायमच दूर ठेवणे पसंद केल्यामुळे त्यांनी वेळोवेळी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली आहे. मात्र पंकजा मुंडे आता भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
पंकजा मुंडे यांनी दोनवेळा दिल्लीत जाऊन काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. सांगलीच्या एका बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी दोन वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. यावेळी पंकजा मुंडे आणि सोनिया गांधी यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पंकजा मुंडे सध्या महासचिव आहेत. आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत मात्र अजून त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ’बीआरएस’कडून पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. यानंतर पंकजा मुंडे भाजपला सोठचिठ्ठी देणार का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले. या ऑफरबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या होत्या की, मी अशा कोणत्याही ऑफरकडे अजून तरी सिरीयसली पाहिले नाही, अशी सूचक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी आपल्या कानावर हात ठेवलेत. पंकजा मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशासंबंधीची मला कोणतीही माहिती नाही. पण पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले. पंकजा मुंडे काँगे्रसमध्ये सहभागी झाल्यास राज्यातील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. कारण पंकजा मुंडे यांना मानणारा ओबीसी समूदाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्यांचा दुजोरा – पंकजा मुंडे भाजपच्या बड्या नेत्या आहेत. त्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पण सध्या त्या नाराज आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा आपली वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिला आहे.

COMMENTS