Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटन

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई ः बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरूवात केल्य

दोन टप्प्यात 50 हजार शिक्षकांची भरती
विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा
विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करावा

मुंबई ः बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरूवात केल्यानंतर सोमवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शाळांमध्ये पॅनिक बटन बसणार असल्याची माहिती दिली आहे. पॅनिक बटणमुळे पोलिसांना त्वरित माहिती पोहोचली जाते व त्यात ट्रॅक करण्याची सिस्टम देखील आहे. हे उपकरण नेटवर्क नसले तरी चालते. यावर दीपक केसरकर म्हणाले की हे बटण जर आम्ही देऊ शकलो तर निश्‍चितपणे महिला अत्याचार कंट्रोलमध्ये येईल अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.
यावेळी बोलतांना मंत्री केसरकर म्हणाले की, या घटनेनंतर सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून कॅबिनेटमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. आदिवासी शाळांवर कंट्रोल नसतो, त्यामुळे त्या शाळा शिक्षण विभागाकडे देण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच पॅनिक बटण महिलांना शाळा व इतर ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकलींचे लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घटना गत आठवड्यात उजेडात आली होती. त्याचे राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील अक्षय शिंदे नामक स्वच्छता कर्मचार्‍याला अटक केली होती. त्याला कोर्टाने 24 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला सोमवारी पुन्हा कल्याण येथील न्यायमूर्ती व्ही ए पत्रावळे यांच्या न्यायदालनात उभे करण्यात आले होते.

आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी – बदलापूर येथील 2 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कोर्टाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपी आता 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. कोर्टातून आरोपीला बाहेरपर्यंत नेताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. वकील पीयूष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी 3 लोकांना अटक करून त्यांची चौकशी करणार आहेत. मात्र वकील पीयूष जाधव यांनी त्यांचे नावे सांगितली नाहीत.

शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब – बदलापूर घटनेप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अनेक खुलासे केले असून, याप्रकरणात शाळेतील सीसीटिव्हीचे मागील 15 दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले आहे. सीसीटीव्ही गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून आल्याची माहिती देखील मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच शाळेच्या पदाधिकार्‍यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही, असे देखील केसरकर म्हणाले.

मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो ः केसरकर – अत्याचाराच्या घटनेतील मुलीला 10 लाखाची मदत केली जाईल आणि जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे तिला तीन लाख मदत करणार आहोत. दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू, त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात देण्यात येणार आहे.  मुलीची ओळख उघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ दोन्ही मुलींना आम्ही मदत करू असेही दीपक केसरकर म्हणाले.   

COMMENTS