Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये अपघातात 9 जणांचा मृत्यू

अहमदाबाद/वृत्तसंस्था : गुजरातच्या अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारचाकी आणि डंपरमध्ये झालेल्या अप

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
खंडाळा घाटातील अपघातात दोघांचा मृत्यू
खड्डय़ांमुळे तीन चाकी मालवाहू टेम्पो पलटला.

अहमदाबाद/वृत्तसंस्था : गुजरातच्या अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारचाकी आणि डंपरमध्ये झालेल्या अपघातात नऊ लोकांचा मृत्यू झाला असून किमान 15 लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्यानंतर आता परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून अपघातामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  
काही दिवसांपूर्वीच सूतरमध्ये अशीच एक घटना घडली होती, त्यानंतर आता अहमदाबादेत नऊ जणांना अपघातात जीव गमवावा लागल्याने शोक व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सरखेज-गांधीनगर या महामार्गावरील इस्कॉन ब्रीजवर कार आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने डंपरसह अन्य गाड्यांना चिरडले आहे. यावेळी ब्रीजवर अनेक गाड्या सावकाश प्रवास करत होत्या. भीषण अपघात झाल्याने तब्बल नऊ लोकांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका सरकारी अधिकार्‍याचाही समावेश असल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 15 लोकांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या अपघाताचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. सरखेज-गांधीनगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे.

COMMENTS