Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर कॉरिडॉर होऊ देणार नाही

सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

पंढरपूर/प्रतिनिधी ः भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सु्रब्रमण्यम स्वामी आक्रमक झाले असून, कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर कॉरिडार होऊ देणार नाह

या दिग्गज क्रिक्रेटपटूची विमा कंपनी लवकरच बाजारात
फॉर यंग विमेन इन सायन्स या शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत  
महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड

पंढरपूर/प्रतिनिधी ः भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सु्रब्रमण्यम स्वामी आक्रमक झाले असून, कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर कॉरिडार होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर आव्हान देऊ नये. अन्यथा देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा घरचा आहेर सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पंढरपुरात सुब्रमण्यम स्वामी यांनी नागरिकांची भेट घेत पंढरपूर कॉरिडॉरला नागरिकांचा नेमका विरोध का आहे? हे समजून घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंढरपुरात सर्व देशवासियांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल मंदिर आहे. कॉरिडॉरऐवजी येथील पायाभूत सुविधांचा आधी सरकराने विकास करायला हवा.


सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंढरपुरात विमानतळ होणे गरजेचे आहे. कारण देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. येथील चंद्रभागा नदी अतिशय प्रदुषित झाली आहे. आधी तिची स्वच्छता होणे गरजेचे आहे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करत देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थानिकांवर कॉरिडॉर लादत असल्याचा आरोप देखील स्वामी यांनी केला.

शिंदे-फडणवीस अनैतिक सरकार – पंढरपूरात सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारवर टीका केली आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, राज्यात एक पक्ष मोडून-तोडून शिंदे-फडणवीस सरकार बनवण्यात आलेले सरकार अनैतिक आहे. सरकारने पंढरपूर कॉरिडॉर जनतेवर लादण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. या सरकारने अहंकारात काहीही करू नये. त्याऐवजी पंढरपूर सुंदर करण्यावर त्यांनी भर द्यावा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.  

COMMENTS