Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तोडलेल्या झाडांचा पंचनामा पण कारवाईस टाळाटाळ

वृक्षतोडीस वनविभागाचा हलगर्जीपणा -डॉ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी - संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्हा 2.4 ईतके कमी वनक्षेत्र आहे.निसर्गाचा समतोल साधण्यासाठी 33 टक्के वनक्षेत्र असणे अपेक्षित असते.यामु

पत्नीने केला नवऱ्याचा खून आणि मृतदेहाला लटकावले फासावर… | LOK News 24
दहा लाखांची खंडणी घेणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यास अटक
शुभमन गिल-सारा तेंडुलकरचा डीपफेक फोटो होतोय व्हायरल

बीड प्रतिनिधी – संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्हा 2.4 ईतके कमी वनक्षेत्र आहे.निसर्गाचा समतोल साधण्यासाठी 33 टक्के वनक्षेत्र असणे अपेक्षित असते.यामुळे बीड जिल्ह्यात वृक्षलागवड करणे अपेक्षित असताना वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.वृक्षलागवड करणे तर सोडाच झाडांचे रक्षण करणे सुद्धा वनविभागाला जमत नाही.सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा पंचनामा व कारवाईसाठी जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात असुन संबंधित प्रकरणात जबाबदार अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रधान सचिव महसूल व वनविभाग मंत्रालय, प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर, प्रादेशिक वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे. बीड तालुक्यातील कानडीघाट येथील शेतकरी लक्ष्मण ज्ञानोबा कवडे आणि हनुमंत ज्ञानोबा कवडे यांनी दि.6 जुलै रोजी त्यांच्या शेतातील मालकीची 25 वर्षे जुनी चिंच व कडुनिंबाची 10-12 झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड, वनपरिक्षेत्र अधिकारी बीड, तहसीलदार बीड यांना केली होती.परंतु 3 दिवस कोणीही स्थळपंचनामा करण्यासाठी आले नाही.विविध दैनिकात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दि.08 जुलै रोजी वनविभागातील कर्मचारी यांनी स्थळपंचनामा केला परंतु 5 दिवस झाले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. का स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त दि.11 सप्टेंबर रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी बिंदुसरा धरणाच्या पायथ्याशी बांबुच्या रोपांची वृक्षलागवड करत बिंदुसरा नदीच्या दोन्ही काठावर प्रत्येकी 8 किलोमीटर अशी एकूण 16 किलोमीटर अंतर लांबीच्या परीसरात 6000 वृक्षलागवड केल्याचा गाजावाजा केला परंतु 8 महिन्यांनंतर दि.7 जुन रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लावलेले झाड सुद्धा अस्तित्वात नव्हते.संबधित प्रकरणात डॉ.गणेश ढवळे यांनी लेखी तक्रार केल्यानंतर दि.13 जुन रोजी अपर जिल्हा दंडाधिकारी बीड संतोष राऊत यांनी विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) बीड व विभागीय वन अधिकारी (सामाजिक) वनीकरण बीड यांना तात्काळ चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करुन तक्रारदार यांना कळवण्याचे आदेश दिले होते.या घटनेला महिना उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलीच नाही.

COMMENTS