Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर

कृषीमंत्री सत्तार ः राज्यात 1 लाख 39 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नंदुरबार/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांसह, फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, आतापर्यंत राज्

जमिन खरेदीप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
एकरी 100 टन ऊसाचे उत्पादन घेणार्‍या महिला शेतकर्‍यांचा सन्मान होणार : संगीता साळुंखे
‘किसन वीर’च्या कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे

नंदुरबार/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांसह, फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, आतापर्यंत राज्यातील 1 लाख 39 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी नंदुरबारमध्ये नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर कृषीमंत्री म्हणाले की, दोन दिवसात वस्तूनिष्ठ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नुकसानीची माहिती मिळेल. मात्र नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत असून, नुकसानग्रस्त शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील नंदुरबारसह 4 ते 5 जिल्ह्यांत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकही नुसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकर्‍यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्‍वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी येथे शेतकर्‍यांना दिला.नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त आष्टे व ठाणेपाडा भागातील नुसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा देताना कृषीमंत्री सत्तार बोलत होते. यावेळी बोलतांना कृषीमंत्री म्हणाले की, कांदा, गहू, बाजरी,पपई, कलिंगडासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकर्‍याला मदत मिळाली पाहिजे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यासाठी अधिवेशन काळातच नुकसानीचा आढावा घेवून पिकनिहाय समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गेल्या सहा महिन्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सुमारे 12 हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी मदत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना केलेली नाही. यावेळीही शेतकर्‍यांना मदत करताना शासन एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करू इच्छिते, असेही यावेळी कृषीमंत्री सत्तार यांनी सांगितले. यावेळीच्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सुरूवातीला 13 हजार हेक्टर, नंतर 40 हजार हेक्टर व आत्ताच्या क्षणाला सुमारे 1 लाख 39 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, हवामान खात्याने 25 मार्च रोजी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात जवळपास 5 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

भरपाईची घोषणा अधिवेशनात करणार – राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकर्‍यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्‍वास कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS