Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात ओशो आश्रमात जोरदार राडा

आंदोलक भाविकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील ओशो आश्रमाची जागा विकण्यासाठी काढल्यामुळे ओशो आश्रम व्यवस्थापन आणि भाविकांचा या जागेवरून वाद सुरू आहे. ओशो आश्रम आणि त

नगरमधील कोविड रुग्णसंख्या लागली घटू ; रोजचा सातशेचा आकडा आला अडीचशेवर, लॉकडाऊनचा परिणाम
कोळगावमध्ये भर दिवसा घरफोडी
तालिबानला भारताचा विरोध… यूएन सिक्योरिटी कौन्सिल रिझोल्युशन लागू करण्याची मागणी

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील ओशो आश्रमाची जागा विकण्यासाठी काढल्यामुळे ओशो आश्रम व्यवस्थापन आणि भाविकांचा या जागेवरून वाद सुरू आहे. ओशो आश्रम आणि त्यांचे विचार जिवंत राहण्यासाठी भाविक आंदोलन सातत्याने आंदोलने करतांना दिसून येत आहे. बुधवारी भाविकांनी आश्रमात प्रवेश केल्यानंतर जोरदार राडा झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर पोलिसांना भाविक आंदोलकांवर लाठीचार्ज करत, गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.
ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर 150 ते 200 ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणार्‍या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधातजोरदार घोषणाबाजी करणार्‍या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत. आचार्य रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी कोरेगाव पार्क येथील आश्रमात आंदोलन केले होते. यावेळी शिष्यांच्या एकजुटीपुढे आश्रम व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत शिष्याना संन्याशी माळा घालून आतमध्ये प्रवेश दिला होता. 70 व्या ओशो संबोधी दिवसानिमित्त कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाच्या गेटवर जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य दाखल झाले होते. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशोंची माळा गळ्यात घालून प्रवेश प्रतिबंध करण्याच्या, ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपौर्णिमा, ओशो संबोधी दिवस असे कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे न करणे, तसेच आश्रमाची जागा विक्रीला काढून ओशो विचार संपवण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात ओशोंच्या शिष्यांनी एकत्र येऊन निदर्शनेही केली होती.

आमचा लढा सुरुच राहणार ः स्वामी चैतन्य कीर्ती – यासंदर्भात अधिक महिती देतांना स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशो प्रेमींना गळ्यामध्ये माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. आश्रमाची जागा विकण्यासाठी काढली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गाने आम्ही आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आश्रम व्यवस्थापनाने बुधवारी आम्हाला आतमध्ये प्रवेश करण्यास मुभा दिली आहे. आमच्या लढ्याला काही प्रमाणात यश आले आहे.

COMMENTS