Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माध्यान्ह भोजनात पाल आढळली

शाळेत 21 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

नांदेड प्रतिनिधी - लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याला खिचडी खाताना मृत पाल आढळून आली  दरम्यान, ह

प्रतीक काळेच्या आत्महत्येशी मंत्री गडाखांचा संबंध? ;माजी आ. मुरकुटेंकडून चौकशीची मागणी
बसच्या गर्दीत वकिलाचे पैशांचे पाकीट मारले
विद्यार्थ्यांनी स्वता: ची ओळख निर्माण करावी अ‍ॅड.अस्मिता मोरे यांचे प्रतिपादन

नांदेड प्रतिनिधी – लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याला खिचडी खाताना मृत पाल आढळून आली  दरम्यान, ही खिचडी शाळेतील 122 विद्यार्थ्यांनी खाल्ली.  काही वेळाने बहुतांश विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला.  त्यामुळे 21 विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बुद्रुक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.  त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत माध्यान्ह भोजन खिचडीचे वाटप करण्यात आले.  हरभरा डाळ आणि खिचडी असे खाद्यान्न होते .शाळेतील काही विद्यार्थ्यांनी ही खिचडी खाल्ली.  काही विद्यार्थ्यांनी तो डब्यात भरून घरी नेली, तर काही विद्यार्थ्यांनी शाळेतच खाली.  यातील पहिलीत शिकणार्‍या आरुषी बेटकर या विद्यार्थिनीला तिचे वडील शिवशंकर बेटकर घरी असताना खिचडीमध्ये मृत पाल आढळून आल्याने तिने हा मृत पाल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला.  काही वेळातच खिचडी खाल्लेल्या काही विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदु,खीचा त्रास सुरू झाला, तर सहा, ते सात ,मुले रडू लागली.  त्यापैकी 21 विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी येथे पुढील उपचारासाठी आणि नंतर पाच जणांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून आता सर्व विद्यार्थीची प्रकृती स्थिर आहे, विशेष म्हणजे शाळेतील खाद्य अन्नपदार्थातील चव प्रारंभी शिक्षकांनी घेण्याची आवश्यकता वाटली नसावी म्हणून हा विद्यार्थ्यांना  विषबाधा झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कापशी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.  येथे वैद्यकीय अधिकारी  डॉ.मुनेश्वर व सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभागाचे पथक शाळेत येऊन उर्वरित विद्यार्थ्यांवर उपचार करत आहे.  अशी माहिती डॉ, रामराव मुनेश्वर यांनी दिली आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनास या संदर्भाचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे

COMMENTS