भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठा हातभार लावल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्
भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठा हातभार लावल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाली आहे, पाकिस्तान जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जाची मागणी करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता असतांना देखील पाकिस्तान दहशतवाद काही सोडतांना दिसून येत नाही. परवाच जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे दोन कॅप्टनसह अन्य दोन जवान शहीद झाले. चकमकीत एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी सैन्याची अतिरिक्त कुमक दाखल आली असून, चकमक तीव्र झाली आहे. दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा अंदाज आहे. हे दहशतवादी रविवारपासून राजौरी परिसरात फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी एका धार्मिक स्थळी आसरा घेतला होता, असेही चौकशीतून पुढे आले आहे.पाकिस्तान जैश-ए-मोहम्मदचे सारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. याच संघटना भारतात दहशतवाद पसरवण्यात गुंतले आहे. जम्मू-काश्मीर खोर्यात सातत्याने दहशत पसरवणे, भारतीय सैनिकांवर हल्ले करणे, हेच काम या संघटनेने दिसून येत आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर आढळून आलेली शस्त्रे आणि इतर वस्तूंवरून या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काश्मिर प्रश्नांवरून दोन्ही देशांमध्ये छुपे युद्ध सुरू आहे. पाकिस्तानने यासाठी आयएसआयने लष्कर- ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, सिमी, इंडियन मुजाहिद्दीन, डेक्कन मुजाहिद्दीन, हुजी यासारख्या दहशतवादी संघटनांचे सहाय्य घेतले. बहुतांशी संघटनांनी पाकिस्तानच्या दबावाखाली आणि तालिबानकडून प्रशिक्षण घेऊन आपल्या दहशतवादी कारवाया सुरू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये दुख्तरन-इ-मिल्लत ही इस्लामी मूलतत्त्ववाद्यांची दहशतवादी महिला संघटनाही सक्रिय आहे. गेल्या 70 वर्षात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांची संख्या 25 हजारपेक्षा जास्त आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या भारतीय संसदेवर हल्ला झाला. गुजरातेतील अक्षरधाम मंदिर, उत्तर प्रदेशातील वाराणसीचे विष्णू मंदिर, मुंबईतील गेट वे नजीकचे ताज हॉटेल, सीएसएमटी रेल्वे स्थानक, ट्रायडंट हॉटेल, लिओपोल्ड हॉटेल, ज्यू धर्मीयांची मंदिर, इत्यादी अनेक मोक्याच्या जागांवर या अतिरेक्यांनी प्रचंड जीवित व वित्तहानी करणारे क्रूर हल्ले केले. हजारो लोकांचे बळी गेले. या कारवाया सध्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अस्तित्वाशी निगडित झाल्या आहेत. भारताची भूमिका मात्र नेहमीच मवाळ स्वरूपाची राहिली.भारतात सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून मदत मिळते, पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करण्यात येतोय हे लपून राहिलेले नाही. भारतात आणि भारतीय उपखंडात सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया या पाकिस्तानच्या भूमीवरुन सुरु आहेत. पाकिस्तानमधून या कारवायांना खतपाणी घालणे सुरु आहे याची कबूली अमेरिकेच्या एका अहवालात दिलेली आहे. अमेरिकेच्या या अहवालात सांगितल्याप्रमाणे, अफगाणी, तालिबान आणि त्या संबंधित असलेल्या हक्कानी नेटवर्क आणि इतर दहशतवादी संघटना या पाकिस्तानच्या भूमीवरुन आपल्या कारवाया चालवतात. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद लपून राहिलेला नाही. त्यामुळे खर्या अर्थाने जागतिक स्तरावर पकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची गरज आहे. दहशतवादांना थारा देणे थांबवा, अन्यथा जागतिक मदत देणे थांबवण्यात येईल अशी भूमिका घेण्याची गरज आहे. वास्तविक पाहता पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी, ते दहशतवाद्यांना आश्रय देतांना दिसून येत आहे. पाकिस्तानने जर दहशतवाद मोडीत काढला तर, पाकिस्तानला आपल्या देशामध्ये सर्वाधिक निधी पायाभूत सोयी-सुविधांवर आणि विकासावर खर्च करता येईल, मात्र गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तान कधीही शहाणा होतांना दिसून येत नाही, त्यामुळे दहशतवाद मोडीत काढणे एक आव्हान बनतांना दिसून येत आहे.
COMMENTS