Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे

मुंबई : पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्

कोपरगावमध्ये एकल महिलांचा फॅशन शो उत्साहात
इंजेक्शनच्या त्या व्हीडिओने उडवली खळबळ ; आनंदऋषीजी हॉस्पिटलने केला खुलासा
आदिवासी महिलांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा डाव – पिचड

मुंबई : पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे तिकिट कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल.

रेल्वे क्रमांक : 04612

प्रस्थान स्थानक : श्री माता वैष्णो देवी कटरा

प्रस्थान वेळा खालीलप्रमाणे :

कटरा – रात्री 21:20

उधमपूर – रात्री 21:48

जम्मू – रात्री 23:00

ही विशेष रेल्वे अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यात आणि नवी दिल्लीकडे सुरक्षित व आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रामबन येथे राष्ट्रीय महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. काश्मीर व जम्मू येथे अडकलेले प्रवाशी या विशेष रेल्वेने प्रवास करु शकतात. ही रेल्वे सकाळी 09:30 वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.

प्रशासन सर्व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS