Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पी.एम. किसान व नमो शेतकरी निधीचे आज वितरण

यवतमाळ येथील सभेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळणार

मुंबई : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर 2023 ते मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ब

देवळाली प्रवरा येथे आदिवासी सन्मान मेळावा उत्साहात
अवैध धंदे बंद करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची 11 व्या दिवशी सांगता  
आय पी एस संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त  

मुंबई : पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर 2023 ते मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी 28 फेब्रुवारी, 2024 रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000 तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून रू. 4000 असा एकुण रू. 6000 चा लाभ ि राज्यातील सुमारे 88.00 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी, 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  अजित पवार राहणार आहेत. शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. कसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेअंतर्गत दि. 24 फेब्रुवारी, 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये रू. 27638 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी रक्कम रू. 1943.46 कोटीचा लाभ  राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकुण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. राज्यात कृषि विभागामार्फत गावपातळीवर विशेष मोहीमेद्वारे राज्यातील सुमारे 18 लाख लाभार्थींची पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झालेली आहे. त्यामुळे या लाभार्थींना पी.एम.किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचा दुहेरी लाभ मिळणे शक्य झाले आहे.

COMMENTS